वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे तुमच्याही कानावर परिणाम होतोय का? ही आहेत लक्षणं, वाचा सविस्तर

वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे तुमच्याही कानावर परिणाम होतोय का? ही आहेत लक्षणं, वाचा सविस्तर

गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या (Impact of noise pollution on hearing capability) ऐकू येण्याच्या क्षमतेत घट होत चालली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या (Impact of noise pollution on hearing capability) ऐकू येण्याच्या क्षमतेत घट होत चालली आहे. वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न आणि एकंदर (Effect of noise on ears) प्रदुषणामुळे कानांवर होणाऱ्या दुष्परिणामांचं प्रमाण वाढत चालल्याचं चित्र या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वाढती वाहनं आणि आवाज यांचा सर्वात पहिला परिणाम हा आवाजावर होत असतो.

होतायत हे त्रास

अनेकांना चाळीशीतच कानाशी संबंधित त्रास सुरू झाल्याचं कर्णरोग तज्ज्ञ सांगत आहेत. कान वाहणं, कानात सतत वेदना होणं, कानात घंटी वाजल्यासारखा आवाज येणं, कानात खसखस पिकल्यासारखा भास होणं अशी अनेक लक्षणं सध्या नागरिकांमध्ये आढळून येत आहेत. काही वर्षांपूर्वी साठीनंतर सुरू होणारी ही लक्षणं आता चाळीशीतच दिसू लागली आहेत. ही धोक्याची घंटा असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कानाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

कान हे पंचेंद्रियांपैकी एक इंद्रिय असून त्याची योग्य काळजी नागरिकांकडून घेतली जात नसल्याचं कानाचे डॉक्टर सांगतात. अऩेकदा नागरिक टोकदार वस्तू कानात घालतात. त्यामुळे कानाच्या पडद्याला भोक पडून कानातून स्त्राव सुरू होण्याची शक्यता असते. बड्स वापरतानादेखील अनेकजण काळजी घेत नाहीत. त्यमुळे कानाला दुखापत होण्याची शक्यता असते. कानाच्या छोट्यामोठ्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी काहीही घरगुती उपाय करताना दिसतात. मात्र त्यामुळे कानावर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

हे वाचा-प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच

डॉक्टरांनी सांगितले हे उपाय

1.    कान नेहमी कोरडे ठेवा

2.    कानात कुठलीही टोकदार वस्तू घालू नका.

3.    कानात पाणी किंवा तेलही घालू नका

4.    कानाशी संबंधित काही त्रास असेल तर तातडीनं डॉक्टरांना भेटा

5.    घरगुती इलाज करताना कानाला इजा झाली तर भविष्यात मोठ्या अडचणी उभ्या राहू शकतात

6.    वेळेत उपाय करा आणि कानाशी विनाकारण छेडछाड करू नका

7.    बहुतांश वेळा छोट्यामोठ्या समस्या आपोआप, नैसर्गिकरित्या दूर होत असता.

Published by: desk news
First published: October 18, 2021, 7:05 PM IST

ताज्या बातम्या