Home /News /lifestyle /

आता हत्तीही जिममध्ये गाळणार घाम; एक्सरसाइज करून फिट राहणार

आता हत्तीही जिममध्ये गाळणार घाम; एक्सरसाइज करून फिट राहणार

हत्तींसाठी (Elephant) विशेष जिम तयार करण्यात आलं आहे.

    सुनील नवप्रभात/डेहराडून, 02 जुलै : स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्ही जिमला (Gym) जात असाल किंवा घरच्या घरी जिम करत असाल, मात्र तुमच्याप्रमाणेच आता हत्तीदेखील (Elephant) स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जाणार आहेत. हो बरोबर वाचलंत, हत्तीदेखील आता जिम करणार आहेत. हत्तींसाठी एक खास जिम तयार करण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand) राजाजी टाइगर रिझर्व्हमध्ये (Rajaji Tiger Reserve) एलिफंट कॅम्प (Elephant Camp) आहे. जिथं हत्तींसाठी जिम्नेजिअम (Gymnasium) तयार करण्यात आलं आहे. हत्तींसाठी या जिममध्ये बॉल, टायर रिंग, मातीचा ढिग असं सर्वकाही आहे. ज्यासह हत्ती खेळतात, मजामस्ती करतात. सध्या या जीममध्ये सहा हत्ती आहेत. हे हत्ती आपल्या कळपातून वेगळे झालेत किंवा उच्छाद मांडताना त्यांना वनविभागाच्या टीमने पकडून आणलं आहे. हे वाचा - हत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल राजाजी टाइगर रिझर्व्हच्या सीनियर वेटनरी अधिकारी डॉ. अदिती शर्मा या हत्तींची आरोग्य तपासणी करतात, त्यांना वैद्यकीय उपचारही देतात. अदिती सांगतात, "कॅम्पमध्ये हत्तींच्या खाण्यापिण्याची पूर्ण सोय असते मात्र त्यांना जंगलाप्रमाणे स्वच्छंद, मुक्तपणे फिरण्याचा आनंद मिळत नाही. या जिम्नेजियममध्ये हत्तींना काहीही करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. तर त्यांना फक्त नैसर्गिक वातावरण दिलं जातं. ज्यामध्ये ते स्वाभाविकरित्या सर्व अॅक्टिव्हिटी करतील. यामुळे हत्तींना मानसिक ताण येणार नाही आणि ते निरोगी राहतील" हे वाचा - फूटबॉलसारखा हत्तीनं उडवला गाडीचा टायर, पुढे काय झालं पाहा VIDEO या जिममधील सहापैकी एका हत्तीने याआधी दोन जणांचा जीव घेतला आहे. मात्र आता हा हत्ती इतका शांत झाला आहे की विश्वासच बसणार नाही. त्याचं नाव राजा आहे. "राजाची रंगीली या हत्तीणीसोबत चांगली मैत्री झाली आहे. दोघंही एकत्रच राहतात. इतकंच नव्हे तर प्रशिक्षणातही राजा तरबेज आहे. तो आपल्या महावताशिवाय कुणाचीच कमांड घेत नाही. पार्कमध्ये राजा आपल्या सोंडेने बॉलसह खेळतो तेव्हा त्याने रागात दोन लोकांचा जीव घेणारा हाच तो हत्ती आहे, यावर विश्वासच बसत नाही", असं अदिती म्हणाल्या. संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Animal, Elephant, Gym

    पुढील बातम्या