हत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल

हत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल

हत्ती मस्त आनंदात आपल्याच धुंदीत एका स्टाइलमध्ये चालताना दिसतो आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून : कॅटवॉक तर आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर (social media) एका हत्तीच्या चालीचा (elephantine gait) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कॅटवॉक विसरून या हत्तीच्याच चालीचे (elephantine walk) तुम्ही दिवाने व्हाल. हत्ती तसा संथ चालीने चालणारा प्राणी. मात्र या व्हिडीओत हत्ती खूप अनोख्या पद्धतीने चालला आहे.

भारतीय वनसेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटवर हत्तीच्या चालीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हत्ती मस्त आपल्याच धुंदीच चालताना दिसतो आहे. हत्ती खूप आनंदात आहे आणि एका विशिष्ट स्टाइलने तो चालतो आहे. अवघ्या 20 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. मात्र तो पाहिल्यानंतर मनालाही खूप प्रसन्नता वाटते.

कॅटवॉक जास्त लोकप्रिय आहे किंवा हत्तीची चाल कमी लोकप्रिय आहे, असं कॅप्शन यावर सुसंता नंदा यांनी दिलं आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनीही बऱ्याच प्रतिक्रिया दिल्यात.

सुशांत नंदा यांनी 20 जूनला हा व्हिडीओ पोस्ट केला. जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 16 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे, तर कित्येकांनी रिट्वीट केला आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 27, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या