• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • तुम्हाला Heart attack येण्याची किती शक्यता? तोंडातून मिळतेय धोक्याची घंटा

तुम्हाला Heart attack येण्याची किती शक्यता? तोंडातून मिळतेय धोक्याची घंटा

हार्ट अटॅक येण्याची शक्यता असेल, तर त्याची लक्षणं तोंडामध्ये दिसू शकतात.

  • Share this:
लंडन, 26 ऑक्टोबर : ताणतणावाची जीवनशैली (LifeStyle), पुरेशा व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे वाढत्या वयात हृदयविकाराचा धोका वाढताना दिसत आहे. दर वर्षी हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) मृत्यू होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल पातळी, आनुवंशिक आजार किंवा वाढतं वय हे घटक हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरतात. हृदयविकारास (Heart Disease) सुरुवात झाली असता त्याची लक्षणं दिसू लागतात. हृदयविकार जीवघेणा असल्यानं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष निश्चितच धोकादायक ठरू शकतं. हार्ट अटॅक येण्याची शक्यता असेल, तर त्याची लक्षणं तोंडामध्ये (Mouth) दिसू शकतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव असल्याने हृदयाच्या यंत्रणेत बिघाड झाल्यास त्याची लक्षणं शरीराच्या विविध भागावर दिसू लागतात. याबाबत फोरसिथ इन्स्टिट्यूट आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकतंच संशोधन केलं. या संशोधनाचा अहवाल कंडक्ट जर्नल ऑफ पीरियोडोंटलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात पीरियोडोंटायटिस (Periodontitis) विकाराचा सामना करणाऱ्या रुग्णांना हदयविकाराचा अधिक धोका असतो, असं स्पष्ट झालं आहे. हे वाचा - पचन क्षमता सुधारण्यासह वजन कमी करण्यात या गोष्टी आहेत गुणकारी; वाचा सर्व फायदे या संशोधनाच्या सुरुवातीला 304 स्वयंसेवकांच्या धमन्या आणि हिरड्यांचा टोमोग्राफी स्कॅन करण्यात आला. चार वर्षांनंतर पुन्हा हे स्कॅनिंग केलं असता, त्यातल्या 13 जणांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं. या संशोधनादरम्यान डॉक्टरांना हिरड्यांची सूज आणि आर्टेरियल इन्फ्लेमेशन (Arterial Inflammation) म्हणजेच धमन्यांमधली सूज यांच्यात संबंध असल्याचं दिसून आलं. यामुळं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखे हृदयविकाराशी संबंधित विकार होऊ शकतात. याचाच अर्थ पीरियोडोंटल इन्फ्लेमेशननं ग्रस्त रुग्णांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हृदयविकार होण्याची शक्यता असेल तर त्यांनी पीरियोडोंटल डिसीजकडं दुर्लक्ष करू नये. यासाठी संबंधित व्यक्ती दंतविकार तज्ज्ञाचाही (Dentist) सल्ला घेऊ शकते. दंतविकार तज्ज्ञ हिरड्यांची तपासणी करून संभाव्य धोक्यांविषयी तुम्हाला माहिती देऊ शकतात आणि वेळीच त्यावर उपचारदेखील घेणं शक्य होतं, असं संशोधकांनी सांगितलं. हे वाचा - ब्रश करताना तुम्हीही अशा चुका करत नाही ना? या पद्धतीनं दात राहतील स्वच्छ, चमकदार ज्यांना पीरियोडोंटल डिसीज होण्यापूर्वी ज्यांना हाडांचा विकार होता त्यांना हृदयविकाराचा धोका नसायचा, हेदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या हिरड्यांमध्ये सूज येण्याची समस्या दिसून आली, केवळ त्यांच्यामध्येच ही समस्या दिसून आली. पीरियोडोंटल इन्फ्लेमेशन हे हाडांच्या माध्यमातून सूचक इशारा देणाऱ्या धमन्यांना कार्यान्वित करतं आणि यामुळे धमन्यांमध्ये इन्फ्लेमेशनची समस्या वाढू लागते, असं संशोधकांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हिरड्यांशी संबंधित कोणत्याही विकाराकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका टळू शकतो, असं संशोधकांनी सांगितलं.
First published: