• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • ब्रश करताना तुम्हीही अशा चुका करत नाही ना? या पद्धतीनं दात राहतील स्वच्छ, चमकदार

ब्रश करताना तुम्हीही अशा चुका करत नाही ना? या पद्धतीनं दात राहतील स्वच्छ, चमकदार

Tips to sparkling teeth: खूप लोकांना ब्रश कसं करावं याबाबत नीट माहिती नसते. दात चमकदार करण्यासाठी दातांमधील साफसफाई योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : तुमच्या दातांचे (teeth) सौंदर्य चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटीने वाढवतं. आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे की ब्रश सकाळी लवकर केलं पाहिजे. पण खूप लोकांना ब्रश कसं करावं याबाबत नीट माहिती नसते. दात चमकदार करण्यासाठी दातांमधील साफसफाई योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. डेलीमेलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दात चमकदार करण्यासाठी काही सोप्या टिप्स (Tips to sparkling teeth) आवश्यक आहेत, ज्याच्या मदतीने चेहऱ्याचे सौंदर्यही वाढवता येतं. ब्रश केल्यानंतर जास्त काळ चुळा भरू नका अनेकजण ब्रश केल्यानंतर बराच वेळ पाण्यानं चुळा भरत राहतात. खरंतर ही चांगली सवय नाही. टूथ पेस्टमध्ये फ्लोराईड असते जे दात किडणे प्रतिबंधित करते. हे एक प्रकारे आपल्या दातांचे रक्षण करते. जर आपण ब्रश केल्यानंतर जास्त काळ पाण्यानं चुळा भरत राहिल्यास फ्लोराईड पाण्यानं धुवून निघून जातं. ब्रश करून झाल्यानंतर फ्लोराईड पूर्णपणे निघून जाणं योग्य नाही. यासाठी ब्रश केल्यानंतर ठराविक काळच पाण्यानं तोंड धुवावे, ज्यामुळं फ्लोराईड टिकून राहते. दातांच्या मधील स्वच्छता आवश्यक प्रत्येकजण ब्रश करतो. काही लोक दिवसातून दोनदा ब्रश करतात, पण एक साधा टूथब्रश फक्त 60 टक्केच दात स्वच्छ करू शकतो. साध्या ब्रशने समोरून आणि मागून दातांची स्वच्छता होते. म्हणजे दोन दातांमधील स्वच्छता करणं शक्य होत नाही. म्हणजेच, घाण दातांच्यामध्ये अडकते, ज्यामुळे नंतर किड लागण्यास सुरुवात होते. त्यामुळं, दातांमधील घाण काढून टाकू शकणारा चांगल्या क्वॉलिटिचा टूथब्रश वापरणे गरजेचे आहे. हे वाचा - India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर आफ्रिदीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला… पेन्सिलप्रमाणं ब्रश धरा आपल्यापैकी बहुतेक जण आपला टूथब्रश घट्ट मुठीत धरतात. त्यामुळे दात घासताना खूप दाब पडतो. असे केल्याने दातांचे संरक्षण करणारे फ्लोराईड देखील बाहेर पडू शकते. दात स्वच्छ करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे टूथब्रशला पेन्सिलप्रमाणे धरून ठेवावे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांना असे आढळले आहे की, पेन्सिलसारखा ब्रश धरल्याने दात स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे पकड मजबूत होत नाही आणि हिरड्या निरोगी राहतात. हे वाचा - सोलापुरात कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात, मदतीऐवजी कोंबड्या पळवण्यासाठी झुंबड, Watch Video कोल्ड्रिंक्स आणि अल्कोहोलला बाय-बाय करा जर तुम्हाला तुमचे दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गॅस, मिश्रित पेये आणि अल्कोहोलयुक्त पेये कमी करा. या दोन्ही गोष्टींमुळे दातांवर मुलामा चढणे, दातांच्या कठीण थरांना नुकसान पोहचते. संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, अल्कोहोलचा जास्त वापर केल्याने दातांचा बाह्य थर खराब होतो. जेव्हा अल्कोहोल वायू मिश्रित पेये म्हणजेच थंड पेयांमध्ये मिसळले जाते तेव्हा त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे दातांचे सौंदर्य टिकवण्यासाठी या गोष्टी टाळा.
  Published by:News18 Desk
  First published: