सुरत, 01 डिसेंबर : कोरोनाव्हायरसने (coronavirus) जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा (Coronavirus) लग्न (wedding) समारंभांबरोबरच इतर सार्वजनिक कार्यक्रमांना देखील फटका बसला आहे. उन्हाळ्यामध्ये कोरोनाच्या संकटात अनेक लग्न रद्द करावी लागली होती. मात्र आता लॉकडाऊनमध्ये (lockdown) सूट दिल्यानंतर लग्न होत आहेत. मात्र यावर काही बंधनं आहेत. फक्त 50 व्यक्तींना लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आली आहे. त्यामुळे काही जणांनी या मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आपलं लग्न थाटात पार पाडण्याचं स्वप्नं पूर्ण केलं तर काहींनी धूमधडाक्यात लग्न करण्यासाठी पैसा जमवला पण साधेपणानं लग्न करत लग्नाचा पैसा सत्कारणी लावला आणि सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अशाच जोडप्यांपैकी एक गुजरातमधील जोडपं आहे.
सुरत (surat) जिल्ह्यातील बारडोलीमध्ये गोयल कुटुंबानं आपल्या घरातील लग्न धुमधडाक्यात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोना काळात लग्न लांबलं. त्यांनी कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अतिशय सध्या पद्धतीनं मंदिरात लग्न झालं.ज्या नातेवाईकांना लग्नात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी फेसबुक लाईव्हचं देखील नियोजन केलं होतं. या लाइव्हच्या माध्यमातून जवळपास 3 हजार नातेवाईकांनी वर आणि वधूला आशीर्वाद दिले.
हे वाचा - 11 वर्षांनी लहान असणाऱ्या Tiktoker शी 'निकाह' करतेय अभिनेत्री गौहर खान
दरम्यान लग्नामध्ये ज्या पैशांची बचत झाली आहे ते पैसे पीएम केयर्स फंडमध्ये (PM Cares Fund) दान केले आहेत. कुटुंबातील मुख्य सदस्य सुरेश गोयल यांनी 3 लाख रुपये पीएम केयर्स फंडमध्ये दान केले आहेत. कोरोना संकटात लढण्यासाठी देशाला आर्थिक मदत व्हावी या हेतूने त्यांनी ही रक्कम दान केली आहे.
हे वाचा - ऐश्वर्याची डुप्लिकेट! ही आहे भारतीय क्रिकेटपटूची पत्नी
देशभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातदेखील जानेवारी- फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या लशीची (corona vaccine) देखील सर्वजण वाट पाहत आहे. विविध कंपन्यांच्या लस अंतिम टप्प्यात असून लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Marriage, PM, Wedding