

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीच्या नेतृत्वात 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवणाऱ्या सुदीप त्यागी (Sudeep Tyagi) याने काहीच दिवसांपूर्वी निवृत्ती घेतली. यानंतर सुदीप त्यागीची पत्नी पिया त्यागी चर्चेत आली आहे. (Photo Piya Tyagi Instagram)


18 नोव्हेंबरला सुदीप त्यागीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं.


सुदीपने 4 वनडे आणि एक टी-20 मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्यागीने कुमार संगकाराची विकेट घेतली. 2010 साली सुदीप भारताकडून शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. सुदीपची पत्नी पिया इन्स्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती स्वत:चे अनेक फोटो शेयर करते.


आयपीएलच्या 2009 आणि 2010 च्या मोसमात सुदीप चेन्नई आणि हैदराबादकडून एकूण 14 मॅच खेळला होता. यानंतर मात्र त्याला आयपीएल खेळायची संधी मिळाली नाही.


पिया त्यागी स्वत:चं युट्युब चॅनल चालवते, यामध्ये ती ब्युटी टिप्स देते सोबतच प्रवासाबाबतची माहितीही सांगते. इन्स्टाग्रामवर पिया त्यागीचे चार लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. सुदीपने निवृत्ती घेतली असली, तरी जिकडे संधी मिळेल तिकडे आपण खेळू असं त्याने स्पष्ट केलं होतं.