11 वर्षांनी लहान असणाऱ्या Tiktoker शी 'निकाह' करतेय गौहर खान, याआधी या बिग बॉस स्पर्धकाला केलं होतं डेट

11 वर्षांनी लहान असणाऱ्या Tiktoker शी 'निकाह' करतेय गौहर खान, याआधी या बिग बॉस स्पर्धकाला केलं होतं डेट

गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) या सेलिब्रिटी कपल 2020 अखेरीस लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 डिसेंबर: अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) ही अभिनेत्री टेलिव्हिजन विश्वात नेहमी चर्चेत असते. बिग बॉस (Big Boss 7) ची विजेती म्हणून आणि वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत असते. आता ही अभिनेत्री इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबार याच्याशी निकाह करणार आहे. याच महिन्यात अभिनेत्री लग्न सोहळा करणार आहे. 25 डिसेंबर रोजी गौहर आणि झैद निकाह करणार आहे. यावेळी कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन हा सोहळा होणार आहे. झैद दरबार आणि गौहरने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zaid Darbar (@zaid_darbar)

झैद दरबार हे नाव देखील सोशल मीडियावरील प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर असणारा झैदचे देखील लाखो फॉलोअर्स आहे.

(हे वाचा-तुम्ही कधीच पाहू शकणार नाहीत BIG B यांच्या या 5 FILMS कारण...)

बिग बॉस 7 ची विजेती राहिलेली अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) म्यूझिक कंपोझर इस्माइल दरबार (Ismail Darbar) यांचा मुलगा आणि प्रसिद्ध टिकटॉकर झैद दरबारला (Zaid Darbar) डेट करण्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या होत्या. आता या कलाकारांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

झैदने सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. झैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर खान आणि अभिनेता कुशाल टंडन दीर्घकाळासाछी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते टिकले नाही. कुशाल देखील बिग बॉस प्रतिस्पर्धी होता. शोमध्ये देखील त्यांची केमिस्ट्री दिसून यायची पण त्यांनी कालांतराने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 1, 2020, 12:39 PM IST
Tags: television

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading