खरोखर चर्चेमध्ये आलेली ही कुर्ती अगदी भारतीय बाजारांमध्ये सहजपणे कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या कुर्तीप्रमाणे दिसते आहे आणि त्यामुळेच एका ट्विटर युजरने वेबसाईटवरच्या कुर्तीचा स्क्रीनशॉट पोस्ट करत गुची अडीच लाखांमध्ये जी भारतीय कुर्ती विकत आहे ती मी दिल्लीच्या सरोजनी नगरमध्ये 500 रुपयात विकत घेऊ शकतो असं कॅप्शन दिलं. (साडीत खुलून दिसलं मितालीचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीचा Traditional Look) यानंतर ट्विटरवर अनेक गमतीदार ट्विट पडायला सुरुवात झालेली आहे. सरोजिनी नगर दिल्लीमधलं प्रसिद्ध मार्केट आहे जिथ अनेक ब्रॅन्डेड शोरूम आहेत. इथे रस्त्यावरही स्वस्तात खरेदी करता येते. या मार्केटमध्ये कपडे,चप्पल,डिझायनर ॲक्सेसरीज मिळतात. तेही कमी किमतीमध्ये त्यामुळेच GUCCI फॅशन ब्रॅन्डवर टीका होऊ लागली. (इवल्याशा हातांनी भरभर कापतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून हैराण व्हाल) GUCCI फॅशन ब्रॅन्ड GUCCI इटली मधला प्रसिद्ध फॅशन ब्रँड आहे. इटली हे फॅशन हब म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथल्या ब्रँडेड वस्तू लाखांच्या घरात विकल्या जातात. अनेक सेलिब्रेटी GUCCIचे ब्रॅन्डटे कपडे वापरतात. GUCCI चप्पल आणि लक्झरी प्रॉडक्ट बनवतो तर, कप्तान म्हणजेच कुर्ती ही आशिया खंडातल्या देशांमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते. भारतात अशा प्रकारचा कुर्ती 500 ते 1500 रुपयांमध्ये सहज मिळू शकते. मात्र GUCCI अडीच लाख रुपये किमतीला ही कुर्ती विकत असल्यामुळे ट्विटर युजर कंपनीवर टीका करत आहेत. मात्र GUCCI आणि वाद काही नवे नाहीत. 2018 साली GUCCI एका वादामुळेही चर्चेत आलेलं आहे. भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याने त्यावेळी टीकाही करण्यात आली होती.Gucci selling an Indian kurta for 2.5 lakhs ? I'll get the same thing for 500 bucks 💀 pic.twitter.com/Opw2mO5xnV
— nalayak (@samisjobless) June 1, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brand, Online shopping