मुंबई, 3 जानेवारी : आयुष्यातील ताणतणावांचा केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्याचा आपल्या केसांवरही खूप परिणाम होतो. अशा स्थितीत खाण्यापिण्यात निष्काळजीपणा हा ट्रिगर सारखा काम करतो. याशिवाय चुकीची जीवनशैली, हार्मोनल बदल, केसांसाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर इत्यादी गोष्टीही केस पांढरे होण्याचे कारण बनतात. अशा परिस्थितीत घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकरित्या केस पुन्हा काळे करू शकता. या घरगुती उपायांमुळे केसांचे पोषण होते आणि केसांचे होणारे नुकसान थांबते. खरे तर लहान वयातच केस पांढरे होऊ लागले तर त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावरही होतो. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे आणि केस पांढरे होण्याची समस्या मुळापासून दूर करणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
हेअर स्ट्रेटनिंग करायला आवडतं? पण जरा जपून.. कॅन्सरचे बनू शकते कारणरीठा आणि शिकेकाई : पांढऱ्या केसांसाठी रीठा आणि शिकेकाई वापरणे खूप फायद्याचे आहे. कारण हे केस पांढरे होण्यापासून रोखतात. रीठा आणि शिकेकाई रात्रभर भिजत ठेवा. यानंतर ते पाण्यात एकत्र उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या. त्यानंतर हे मिश्रण केसांवर शॅम्पू म्हणून वापरा.
काळे तीळ : आठवड्यातून दोन ते तीन वेळा एक चमचा काळे तीळ खाल्ल्याने केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. काळे तीळ केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद करू शकते. आवळा : आवळा आपल्या केसांसाठी कायमच खूप फायदेशीर मानला गेला आहे. कोरडे आवळ्याचे तुकडे रात्रभर भिजू घाला. आवळ्याचे हे पाणी नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापरा. तणावापासून दूर राहा : हल्लीच्या काळात केस पांढरे होण्याचे मुख्य कारण आहे तणाव. त्यामुळेच तुम्हाला जर तुमचे केस काळेच हवे असतील तर तणावापासून दूर राहा. केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप कमी होईल. Hair Fall : रोज किती केस गळणं असतं नॉर्मल? पाहा कधी व्हायला हवं सावध भाज्या आणि फळं खा : योग्य जीवनशैलीमध्ये योग्य आहार खूप महत्वाचा असतो. केसांना संपूर्ण पोषण मिळावे यासाठी भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. कारण यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचबरोबर आहारात अधिकाधिक संपूर्ण धान्य, कडधान्ये, बीन्स, चिकन, अंडी आणि मासे यांचाही समावेश करा.