मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रात्री चुकूनही पिऊ नका Green tea, आरोग्याला पोहोचेल हानी; जाणून घ्या योग्य वेळ कोणती?

रात्री चुकूनही पिऊ नका Green tea, आरोग्याला पोहोचेल हानी; जाणून घ्या योग्य वेळ कोणती?

चायवाला हा ब्रँड आपली विशेष कॉफी आणि चहा, मसाला चिप्स, बॉम्बे सँडविच, चिल्ली पनीर, बटर चिकन, रोटी, पराठा आणि भारतीय नाश्ता यासारखी अनेक उत्पादने विकणार आहे, असं फ्रेंचायजी इंडियाने सांगितलं आहे.

चायवाला हा ब्रँड आपली विशेष कॉफी आणि चहा, मसाला चिप्स, बॉम्बे सँडविच, चिल्ली पनीर, बटर चिकन, रोटी, पराठा आणि भारतीय नाश्ता यासारखी अनेक उत्पादने विकणार आहे, असं फ्रेंचायजी इंडियाने सांगितलं आहे.

सकाळी (morning) ग्रीन टी (Green tea) पिणं आरोग्यासाठी (health) जितकं फायदेशीर आहे, तितकंच रात्री (night) ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी हानीकारक आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 फेब्रुवारी : ग्रीन टी (green tea) हा अनेकांच्या डाएटचा (diet) एक भाग आहे. फिट राहण्यासाठी बहुतेक लोकं ग्रीन टी पितात. सकाळच्या (morning) वेळेला ग्रीन टी पिणं फायदेशीर आहे. मात्र रात्रीदेखील (night) तुम्ही ग्रीन टी पित असाल, तर तुमच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

ग्रीन टीमध्ये फ्लेवोनाइडची मात्रा योग्य असते, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते, शिवाय वाईट कोलेस्ट्रॉलही नियंत्रित होते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. मात्र ग्रीन टी पिण्याचीही एक विशिष्ट वेळ असते आणि जर कोणत्याही वेळेला तुम्ही ग्रीन टी प्यायल्यात तर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्हीदेखील अशा अनियमित वेळेला ग्रीन टी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते नुकसानकारक ठरू शकतं. रात्र ही ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ नाही.

हेदेखील वाचा - बारीक व्हायचंय मग पोटभर नाश्ता आणि जेवण कमी करा

रात्री ग्रीन टी प्यायल्याने काय होतं?

रात्री ग्रीन टी प्यायल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो.

झोपेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे रात्री आवश्यक असलेली गाढ झोप तुम्हाला लागणार आहे.

रात्री नीट झोप न लागल्याने त्यानंतरचा पूर्ण दिवस खराब होईल.

दिवसभर तुमची चिडचिड होईल

शिवाय झोप अपुरी असल्याने अनेक समस्याही बळावू शकतात.

हेदेखील वाचा - हेल्दी म्हणून मुलांना ज्युस देताय, मुलांचं आरोग्य धोक्यात घालताय

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. ग्रीन टी मध्ये थीनिन कोर्टिसोलसारखे तणावसंबंधित हार्मोन्स कमी करण्याचं काम करतात. ग्रीन टीमध्ये कॉफीच्या तुलनेत कॅफिनेचं प्रमाण कमी असतं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार सकाळी ग्रीन टी प्यायल्याने रात्री जोप चांगली लागते. निरोगी राहण्यासाठी आणि रात्री चांगली झोप लागण्यासाठी सकाळी किंवा दुपारी एक ते दोन कप ग्रीन टी घेणं फायदेशीर आहे. तर रात्री 2 तास आधी ग्रीन टीचं सेवन न करणंच योग्य आहे.

First published: