मुंबई, 24 फेब्रुवारी : ज्युस (Juice) म्हटलं की तो हेल्दी (Healthy) आहे असंच आपल्याला वाटतं. त्यामुळे पालकही आपल्या मुलांना हेल्दी ठेवण्यासाठी त्यांना ज्युस देतात. आई-वडील दोघंही कामावर जात असल्याने मुलांना घरात ज्युस बनवून देण्याइतका वेळ नसतो. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेले पॅक ज्युस (Packed juice) पालक आपल्या मुलांना देतात. तुम्हीदेखील तुमच्या मुलांना असं पॅक ज्युस देत असाल तर सावध व्हा. कारण तुमच्या मुलाचं आरोग्य (child health) तुम्ही धोक्यात घालत आहात.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनाुसार पॅकेटमध्ये असलेलं ज्युस मुलांसाठी हानिकारक ठरू शकतं. अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पॅकेटचं ज्युस देऊ नये. तसंच सोडा आणि सॉफ्ट ड्रिंकही देऊ नये.
हेदेखील वाचा - घराची साफसफाई करताय सावधान ! पालकांनो मुलांचं आरोग्य धोक्यात तर घालत नाहीत ना?
पॅक ज्युस प्यायल्याने मुलांच्या मेंदूचा विकास थांबतो
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, पॅक ज्युसमध्ये ब्रोमिनेटेड वनस्पती तेल असतं, जे ब्रोमीन टॉक्सिन निर्माण करू सकतं. ब्रोनिन टॉक्सिनच्या मुलांच्या मेंदूवरही दुष्परिणाम होऊ शकतो.
शिवाय यामध्ये कॅडमियम, कार्बेनिक, आर्सेनिक आणि मर्क्युरी असतं आणि असं ज्युस मुलांना दिल्यानं त्यांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मुलांच्या मेंदूचा विकास थांबू शकतो.
पॅक ज्युसमुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम
याशिवाय पॅकेटमधील ज्युस प्यायल्याने मुलांना गॅस, डायरिया, पोटदुखी अशा समस्या बळावू शकतात. पॅकेट ज्युस आणि ड्रिंक्समध्ये कॅलरी, साखरेची मात्रा जास्त असते, जे लहान मुलांना नुकसान पोहोचवू शकतं. याशिवाय हा ज्युस मुलांच्या दातांच्या कॅविटीसाठी कारणीभूत ठरू शकतो.
हेदेखील वाचा - बापरे ! मुलगी की झाडाचं खोड; दुर्गम भागातल्या चिमुरडीची विचित्र आजाराशी झुंज
'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना औरंगाबादमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितलं, “मुलांना पॅक ज्युस कधीच देऊ नये. यामध्ये स्वीटर्नस असतात, सुक्रोजचं प्रमाण जास्त असतं. यामुळे मुलांची शुगर जास्त प्रमाणात वाढते आणि मुलांना भूक लागत नाही. त्यामुळे मुलं जेवत नाहीत. शिवाय पॅक ज्युस दिल्याने मुलांना डायबेटिजचा धोका जास्त असतो.
खरंतर मुलांना वयाच्या 1 वर्षापर्यंत ज्युस देऊच नये. 6 महिने झाल्यानंतर मुलांना फळं मॅश करून द्या आणि मुलं एक वर्षाची झाल्यानंतर त्यांना घरच्या घरी तयार केलेला फळांचा ज्युस द्या", असा सल्ला डॉ. अन्नदाते यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Child care, Health, Juice