बारीक व्हायचंय मग पोटभर नाश्ता आणि जेवण कमी करा

बारीक व्हायचंय मग पोटभर नाश्ता आणि जेवण कमी करा

रात्री भरपेट जेवण (Dinner) करण्याऐवजी सकाळी भरपेट नाश्ता (Breakfast) केला, तर लठ्ठपणा (obesity) आणि हाय ब्लडशुगरपासून (High blood suger) संरक्षण मिळू शकतं, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : वाढलेलं वजन (Weight) कमी करण्यासाठी तुम्ही दिवसातून एकदाच खात असाल आणि त्यातही सकाळचा ब्रेकफास्ट (Breakfast) टाळून फक्त रात्रीचं जेवण (Dinner) करत असला, तर ही बातमी तुमच्यासाठी. तुमच्या या डाएट प्लॅनने तुमचं वजन तर कमी होणार नाही, उलट अशक्तपणा येईल. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तर भरपेट नाश्ता म्हणजे हेवी ब्रेकफास्ट (Heavy breakfast) आणि रात्रीचं जेवण कमी म्हणजे लाइट डिनर (Light dinner) घ्या.

जेवणाप्रमाणे नाश्ता केल्याने शरीरात थर्मोजेनेसिस (thermogenesis) तयार होतं, ज्यामुळे शरीरात फॅटची निर्मिती जास्त होत नाही. शिवाय रक्तातील साखरेची पातळी म्हणजे ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहतं, इन्सुलिन योग्यप्रकारे तयार होतं. जर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोक्रायनोलॉजी अँड मेटाबोलिझ्म (The Journal of Clinical Endocrinology & Metabolism) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा - हेल्दी म्हणून मुलांना ज्युस देताय, मुलांचं आरोग्य धोक्यात घालताय

संशोधनाचे अभ्यासक जुलाइन रिश्चटर म्हणाले, "आमच्या अभ्यासात दिसून आलं की, कॅलरीचा विचार न करता जेवणाप्रमाणे ब्रेकफास्ट केल्यानं रात्रीच्या जेवणाइतकीच हाय डाएट इन्ड्युस थर्मोजेनेसिसची (high diet-induced thermogenesis) निर्मिती होते. पुरेसा ब्रेकफास्ट न करण्याऱ्या व्यक्तींसाठी हे खूप महत्त्वाचं असं संशोधन आहे”

संशोधनानुसार, एखाद्या पदार्थाचं शरीरात पचन, वहन आणि आवश्यक घटकांचा साठा यासाठी शरीराची खर्च होणारी ऊर्जा, या संपूर्ण प्रक्रियेला डाएट-इन्ड्युस थर्मोजेनेसिस (DIT) म्हणतात. आपली चयापचय प्रक्रिया कशी आहे, हे DIT मुळे ओळखता येते आणि आपल्या खाण्याच्या वेळेनुसार ते बदलतं.

संशोधनात दिसून आलं की, रात्रीच्या तुलनेत सकाळी त्याच प्रमाणात कॅलरी घेतल्यास DIT 2.5 पटीने जास्त असतो. शिवाय यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन यावरही नियंत्रण राहतं. उलट लो कॅलरी ब्रेकफास्ट घेतल्याने भूक वाढते, विशेषत: गोड खाण्याची इच्छा होते.

हेदेखील वाचा - तारुण्य ते म्हातारपण, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असा असावा महिलांचा आहार

लठ्ठ रुग्ण आणि हेल्दी लोकांनीही वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंबंधी आजारांपासून वाचण्यासठी रात्री भरपूर जेवण्यापेक्षा सकाळी भरपूर ब्रेकफास्ट करा, असा सल्ला आम्ही देतो, असं रिश्चटर म्हणाले.

 

First published: February 25, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या