मोदी सरकारचा मोठा झटका; ब्लॉक केले Dating and Flirt Chinese Mobile app

मोदी सरकारचा मोठा झटका; ब्लॉक केले Dating and Flirt Chinese Mobile app

मोदी सरकारनं आणखी 43 mobile apps ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : टिकटॉक, पब्जी या मोबाईल अॅपनंतर  भारतात (india) आणखी 43 mobile apps ब्लॉक करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त Chinese app चा समावेश आहे.  सुरक्षेसाठी मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (Ministry of Electronics and Information Technology) याबाबत आदेश जारी केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (Information Technology Act) Section 69A अंतर्गत मोबाईल अॅप ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतात वापरल्या जात असलेल्या 43 mobile apps मुळे देशाच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा उपस्थित झाला आहे. भारताच्या सायबर क्राइम समन्वयक केंद्राकडून (Indian Cyber Crime Coordination Center) अहवाल मिळाला होता. या अॅपमुळे भारताचं सार्वभौमत्व, एकता आणि सुरक्षेला धोका पोहोचत असल्यानं केंद्र सरकारनं सांगितलं. त्यामुळे मोदी सरकारनं तातडीनं पावलं उचलत हे मोबाइल अॅप ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी 28 जूनला भारतानं 59 आणि 2 सप्टेंबरला 118 Chinese mobile apps बॅन केले होते. मोदी सरकारनं नव्यानं ब्लॉक केलेल्या मोबाईल अॅपच्या यादीतही चायनीझ अॅपचा समावेश आहे. यामध्ये बहुतेक अॅप हे डेटिंग अॅप आहेत.  WeDate, Date in Asia, TrulyAsian, DateMyAge, AsianDate, FlirtWish असे अॅप सरकारनं ब्लॉक केले आहेत.

हे वाचा - काय आहे WhatsApp OTP scam; जाणून घ्या कसा कराल यापासून बचाव

याशिवाय अली बाबाच्या अॅप्सचाही समावेश आहे. याआधी अली बाबाचे काही अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता त्याच्या सपोर्टिंग अॅपवरही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये AliExpress, Alipay Cashier, Alibaba Workbench या अॅप्सचा समावेश आहे.

नव्यानं बॅन केलेल्या 43 mobile app ची यादी

1) AliExpress - Smarter Shopping, Better Living

2) Alipay Cashier

3) Lalamove India - Delivery App

4) Drive with Lalamove India

5) Snack Video

6) CamCard - Business Card Reader

7) CamCard - BCR (Western)

8) Soul- Follow the soul to find you

9) Chinese Social - Free Online Dating Video App & Chat

10) Date in Asia - Dating & Chat For Asian Singles<

11) WeDate-Dating App

12) Free dating app-Singol, start your date!

13) Adore App

14) TrulyChinese - Chinese Dating App

15) TrulyAsian - Asian Dating App

16) ChinaLove: dating app for Chinese singles

17) DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online

18) AsianDate: find Asian singles

19) FlirtWish: chat with singles

20) Guys Only Dating: Gay Chat

21) Tubit: Live Streams

22) WeWorkChina

23) First Love Live- super hot live beauties live online

24) Rela - Lesbian Social Network

25) Cashier Wallet

हे वाचा - Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर, द्यावं लागणार शुल्क

26) MangoTV

27) MGTV-HunanTV official TV APP

28) WeTV - TV version

29) WeTV - Cdrama, Kdrama&More

30) WeTV Lite

31) Lucky Live-Live Video Streaming App

32) Taobao Live

33) DingTalk

34) Identity V

35) Isoland 2: Ashes of Time

36) BoxStar (Early Access)

37) Heroes Evolved

38) Happy Fish

39) Jellipop Match-Decorate your dream island!

40) Munchkin Match: magic home building

41) Conquista Online II

42) AliSuppliers Mobile App

43) Alibaba Workbench

Published by: Priya Lad
First published: November 24, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या