मुंबई, 14 जुलै : लहान मुलांना जसे शेजारच्या मुलांसोबत खेळायला आवडते. तसेच त्यांना शेजाऱ्यांच्या घरीदेखील जायला आवडते. अनेक वेळा आपण मुलांना कितीही समजावून सांगितले तरी ते नीट वागत बोलत नाही. त्यामुळे मुलं दुसऱ्याच्या घरी जाऊन चुकीची वागली तर अनेकदा पालकांना कळत नाही की मुलांना कसे समजावून सांगावे. मात्र या प्रश्नावर आज आम्ही उत्तर घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही मुलांना शिष्टाचार म्हणजेच एटीकेट्स कसे शिकवू शकता. जेणेकरून मुलं इतरांच्या घरी जाऊन चुकीचे वर्तन करणार नाहीत (Good Habits For Kids) आणि घरातील इतर सदस्यांना त्यामुळे त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया मुलांना कोणते एटीकेट्स शिकवणे गरजेचे आहे. शेजाऱ्याच्या घरी पाठवण्यापूर्वी मुलांना लावा या चांगल्या सवयी… - स्कॉलॅस्टिकनुसार, आपल्या मुलांना उदार बनवा. मुलांना शिकवा की, दुसर्या कोणाला किंवा शेजाऱ्याच्या मुलाला त्याच्या मदतीची गरज असल्यास त्याने मुलाने मागे हटू नये आणि एकत्र काम करावे. हे शिकवताना नैतिक शिक्षणाशी संबंधित गोष्टी मुलांना सांगा. - त्यांना सांगा की स्वतःहून मोठ्या लोकांना नावाने हाक मारू नका. उदाहरणार्थ मोठ्या व्यक्तींना काका, काकू, मावशी अशी हाक मारणे आणि त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांना ताई आणि दादा म्हणायला शिकवा.
Fitness Tips : जिममध्ये न जाता फिट कसे राहायचे? फिटनेस एक्स्पर्ट्सने दिलेल्या फिटनेस टिप्स- मुलाना शिकवा की, कुठेही गेल्यावर कोणाचीही चेष्टा करणे किंवा त्यांच्यावर अश्लील टिप्पणी करणे टाळावे. त्यामुळे मुलांना शेजाऱ्यांकडूनही प्रशंसा मिळेल. - कोणाच्याही घरी गेल्यावर मुलांनी मोठ्यांचे म्हणणे ऐकावे. जर कोणी मोठी व्यक्ती काही शिकवत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि मोठ्यांचे लक्षपूर्वक ऐकावे. अशी मुलांना सवय लावा. - मुलांना शिकवा की, शेजाऱ्यांच्या घरी गेल्यावर काहीही खात असताना ते हळूहळू आणि व्यवस्थित खावे. Cumin Benefits : केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते जिरे - मुलांना कोणाच्याही घरी गेल्यावर शूज आणि चप्पल बाहेर काढण्याची सवय लावा. - मुलांना हेदेखील शिकवा की, इतरांच्या वस्तूंना त्यांना न विचारता हात लावू नये.