नवी दिल्ली, 03 एप्रिल : तुमच्या घरात लग्नकार्य असेल आणि तुम्ही सोनं
(Gold) किंवा हिऱ्याचे
(Diamond) दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लग्नाच्या सिझनमध्ये
(wedding season) सोन्याचे दर
(Gold price) कमी होणार आहेत, त्यासोबतच हिरासुद्धा स्वस्त झाला आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका.
सध्या सोन्याचे दर प्रति तोळा 44,701 रुपये आहे. आपल्या सर्वात उच्चांकी दरापेक्षा सोनं तब्बल 11,500 रुपयांनी कमी झालं आहे. ऑगस्ट, 2021 मध्ये सोनं जवळपास 56,200 रुपये या उच्चांकी दरापर्यंत पोहोचलं होतं. आता लग्न सिझन सुरू होणार आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सोन्याची मागणी वाढेल.त्यावेळी तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी करू शकता.त्यामुळे सोनं-हिरे खरेदीची हीच योग्यवेळ आहे.
हे वाचा - 809 रुपयांचा एलपीजी गॅस सिलेंडर फक्त 9 रुपयात! कशी मिळवायची ही भारी ऑफर?
दिल्लीतील सराफा बाजारातील बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, छोट्या हिऱ्यांच्या कॅटेगिरीत दर कमी झाले आहेत. मध्यमवर्गीच भारतीयांमध्ये रिंग आणि नेकलेसची मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर घटत आहेत. आता सध्या दर थोडे वाढले आहेत पण येत्या काही दिवसांत सोनं स्वस्त होऊ शकतं. लग्नाच्या सिझनमध्ये सोन्याचा भाव 42,000 राहू शकतो.
तर ज्वेलर्स आशिष जावेरी यांनी सांगितलं, सोनं आणखी घसरेल. जवळपास 1500 डॉलर प्रति औंस पर्यंत घसरू शकतं त्यानंतर दर स्थिरावतील. याच अंदाजाने भारतीय मूल्यानुसार सोनं जवळपास 38,800 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतं. पण कदाचित सोन्याच्या किमती वाढण्याचीही शक्यता आहे. तसे काही संकेत मिळत आहेत.
हे वाचा - सुकन्या समृद्धी, PPF, SCSS की KVP; बचत योजनांमधील कोणता पर्याय योग्य?
2 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने मल्टी कमोडिटी (MCX - Multi Commodity Exchange) एक्सजेंच बंद होतं. याआधी जागतिक बाजारात सोनं वधारल्यानंतर दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं 881 रुपयांनी वाढून 44,701 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं. त्याआधीच्या सत्रात म्हणजे बुधवारी सोनं 43,820 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. सोन्याप्रमाणे चांदीचेही दर वाढले. चांदी प्रति किलो 1,071 रुपयांनी वाढून 63,256 रुपये झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,719 डॉलर प्रति आणि चांदी 24.48 डॉलर प्रति औंसच्या आसपासच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.