Home /News /lifestyle /

IIT विद्यार्थिनीनंतर आता डॉक्टर महिलेबरोबरही घडला भयानक प्रकार; पार्लर ट्रीटमेंटनंतर चेहऱ्याची झाली ही अवस्था

IIT विद्यार्थिनीनंतर आता डॉक्टर महिलेबरोबरही घडला भयानक प्रकार; पार्लर ट्रीटमेंटनंतर चेहऱ्याची झाली ही अवस्था

सौंदर्योपचार अर्थात ब्युटी ट्रीटमेंट घेणं एका डॉक्टर महिलेसाठीच भयानक परिणाम करणारं ठरलं आहे. त्यांचे फोटो अंगावर काटा आणतात. तेव्हा पार्लर ट्रीटमेंट घेताना जपून. नवा प्रयोग करण्याआधी हे वाचा

    गोलाघाट, 13 फेब्रुवारी : सुंदर, आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? त्यासाठी विविध आधुनिक ब्युटी ट्रीटमेंट्सची (beauty treatment) मदत घेतली जाते. यातून कधी तात्पुरते बदल लुकमध्ये केले जातात. अपवादात्मक केसेसमध्ये चुकीची ट्रीटमेंट किंवा अन्य कारणांनी या सौंदर्योपचारांचे भयानक परिणाम किंवा साईड इफेक्ट्स समोर येतात. गोलाघाटच्या एका महिलेसोबत हेच घडलं आहे. गोलाघाटाच्या चंदमरी इथं राहणारी ही महिला उच्चशिक्षित आहे. व्यवसायानं डेंटिस्ट (dentist) असलेल्या या महिलेचं नाव आहे डॉ. लिझा देवी. लिझा यांनी 'बिफोर' आणि 'आफ्टर' असे आपल्या सौंदर्योपचाराचे फोटो शेअर केले आहेत. एका अतिशय प्रतिष्ठित ब्युटी पार्लरमध्ये (beauty parlour) त्या गेल्या अहोत्या. डॉ. लिझा यांच्या म्हणण्यानुसार, पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी चेहऱ्यावर वाफ देताना त्यांचा चेहरा निष्काळजीपणातून जाळला. (Dr. Liza Devi beauty experience) आपला भयानक अनुभव सांगतांना लिझा देवी म्हणाल्या, की त्या 'काया युनिसेक्स ब्युटी सलून'मध्ये (Kaya unisex beauty salon) गेल्या होत्या. त्यांना फेशियल (facial) करवून घ्यायचं होतं. बहिणीच्या लग्नाआधी (sister's marriage) हे फेशियल त्यांना करून घ्यायचं होतं. मात्र फेशियल करवून घेताना पार्लरमधल्या कर्मचार्यांनं चेहऱ्यावर वाफ देताना निष्काळजीपणा केला. त्यातून लिझा यांच्या चेहऱ्यावरच वॉटर स्टीमरमधलं (water steamer) उकळतं पाणी (boliing water) ओतलं गेलं. यातून चेहऱ्याची नाजूक त्वचा थेट जळाली. लिझा यांच्या म्हणण्यानुसार, हे वॉटर स्टीमर वाईट दर्जाचं होतं. शिवाय ती कर्मचारीही नीटपणे प्रशिक्षित नव्हती. त्यातून हा गंभीर प्रकार घडला. डॉ. लिझा या गोलाघाटच्या चिरंजिया शासकीय रुग्णालयात कार्यरत असतात. आता त्या स्वतःच चेहऱ्याच्या जखमांवर उपचार घेत आहेत. मात्र आता बुरखा (veil) घालून आपलं रोजचं काम सुरू ठेवायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लिझा यांना बरं होण्यासाठी किमान सहा महिने लागतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हेही वाचारहस्यमय! अल्पवयीन मुलीच्या गर्भातून कसं गायब झालं भ्रूण? CID करणार तपास लिझा यांच्या बहिणीच्या लग्नाची तारीख मात्र जवळ येते आहे. आणि ही सगळी परिस्थिती त्यांच्यासाठी कमालीची उद्विग्न करणारी आहे. लिझा आता कलेक्टर आणि न्यायालय अशा दोन्ही ठिकाणी या प्रकाराबाबत स्वतंत्रपणे तक्रार दाखल करणार आहेत. गोलाघाटच्या तपन नगर (Tapan Nagar) भागातील 'काया युनिसेक्स पार्लर'शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काही दिवसांपूवीच डॉ. बिनिता नाथ या गुवाहाटी आयआयटी (Guwahati IIT) विद्यार्थिनीच्या सोबत असाच भयानक प्रकार घडला होता. बिनिता ब्लीच करवून घेत होत्या. त्यावेळी त्यांचा चेहरा जळला होता. त्यांनी फेसबुकवर हा सगळा प्रकार कथन करत आपला चेहरा दाखवला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Facebook, Woman doctor

    पुढील बातम्या