नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : दूध (Milk) हा आरोग्यदायी पदार्थ आहे. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीसाठी दुग्धपान फायदेशीर असतं. दुधात कॅल्शियमसह अनेक पोषक घटक असतात. लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी दूध फारच उपयुक्त मानलं जातं. आपण रोजच्या आहारात गाय, म्हशीचं दूध पितो; पण शेळीचं दूधही (Goat Milk) लाभदायक असतं. नियमितपणे शेळीचं दूध प्यायल्याने शारीरिकदृष्ट्या अनेक फायदे होतात.
सध्याच्या काळात बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि चुकीच्या आहारामुळे (Diet) डायबेटीस होण्याचं प्रमाण वाढलं आहे; मात्र शेळीचं दूध डायबेटीसच्या रुग्णांसाठीदेखील उपयुक्त मानलं जातं. त्वचेचं सौंदर्य, रक्तातल्या प्लेटलेट्स वाढण्यासाठी हे दूध मदत करतं. `हेल्थ शॉट्स डॉट कॉम`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गाय, म्हशीच्या दुधाप्रमाणेच शेळीचं दूधदेखील आरोग्यदायी मानलं जातं. आयुर्वेदानुसार, गाय आणि म्हशीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचं दूध पचायला हलकं असतं. त्यामुळे ज्यांना गाय, म्हशीचं दूध पचत नाही त्यांना शेळीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डेंग्यू (Dengue) या आजारात शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होतात. त्या वेळी रुग्णानं शेळीचं दूध पिणं लाभदायक मानलं जातं.
Diabetes Tips : 2 मिनिटात कमी होईल वाढलेली ब्लड शुगर; फक्त रोज जेवण झाल्यानंतर करा हे काम
गेल्या काही वर्षांत डायबेटीसच्या (Diabetes) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती झाली, तर आपली ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात राहते. तसंच जेव्हा रक्तात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा ते यकृतातल्या उरलेल्या ग्लुकोजचंही संतुलन करतं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या मते, शेळीचं दूध इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता रोखण्यास मदत करतं. इन्सुलिनची निर्मिती कमी प्रमाणात होत असेल तर रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे डायबेटीस टाइप-2 होऊ शकतो.
डेंग्यू झाल्यावर शरीरातल्या प्लेटलेट्स (Platelets) झपाट्याने कमी होऊ लागतात. अशा वेळी शेळीचं दूध पिणं फायदेशीर मानलं जातं. 'रिसर्चगेट'वर जानेवारी 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, डेंग्यूचे रुग्ण बरे होण्यासाठी शेळीचं दूध हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण त्यामुळे शरीरातल्या प्लेटलेट्स वेगानं वाढण्यास मदत होते.
'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी'च्या म्हणण्यानुसार, शेळीच्या दुधामुळे आपली चयापचय क्रिया (Metabolism) सुरळीत होते आणि ते पचायलाही खूप हलकं असतं. या दुधात लॅक्टोजचं प्रमाण खूप असल्याने गायीच्या दुधाला ते एक उत्तम पर्याय ठरतं.
त्वचेच्या आरोग्यासाठी शेळीचं दूध फायदेशीर मानलं जातं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने दिलेल्या माहितीनुसार, हे दूध आपल्या त्वचेसाठी सक्रिय घटक म्हणून काम करतं. शेळीच्या दुधाचा पीएच (PH) अर्थात सामू हा आपल्या त्वचेच्या सामूइतका असतो. त्यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही. याशिवाय शेळीच्या दुधातलं लॅक्टिक अॅसिड आणि फॅटी अॅसिड त्वचा चांगली होण्यासाठी मदत करतं.
डाळिंबाच्या ज्यूसने केवळ 15 मिनिटात कमी होते डायबिटीजच्या रुग्णाची शुगर; वाचा काय म्हणतात संशोधक
हेल्दी वेट (Healthy Weight) अर्थात निरोगी वजनामुळे अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. शेळीच्या दुधात गायीच्या दुधाइतकेच पोषक घटक असतात; मात्र या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेत कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे हे दूध वजन वाढण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या मते, लहान मूल अशक्त किंवा कमी वजनाचं असेल तर त्याला शेळीचं दूध पिण्यास द्यावं. यामुळे वजन लवकर वाढतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goat, Milk combinations