मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetes Tips : 2 मिनिटात कमी होईल वाढलेली ब्लड शुगर; फक्त रोज जेवण झाल्यानंतर करा हे काम

Diabetes Tips : 2 मिनिटात कमी होईल वाढलेली ब्लड शुगर; फक्त रोज जेवण झाल्यानंतर करा हे काम

जेवणानंतर अशी कमी करा ब्लड शुगर लेव्हल.

जेवणानंतर अशी कमी करा ब्लड शुगर लेव्हल.

जर तुम्ही जेवण झाल्ल्यानंतर लगेच झोपत असाल तर तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. खाल्ल्यानंतर लगेच झोपणे आपल्या शरीरासाठी चांगले नसते.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 20 ऑगस्ट : सर्व वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणात मधुमेहाला बळी पडत आहेत. हे टाळण्यासाठी लोकांना त्यांची जीवनशैली आणि आहार सुधारण्याचा सल्ला दिला जातो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग समोर आला आहे. जेवणानंतर 2 मिनिटे चालणे टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करू शकतो. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण तज्ज्ञही ही गोष्ट खरी मानत आहेत. चालण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. दररोज चालण्याने मधुमेहासह अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. जेवल्यानंतर चालण्याने मधुमेहाचा धोका कसा कमी होतो हे जाणून घेऊया.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जेवणानंतर फक्त 2-5 मिनिटे चालणे रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकते. आयर्लंडमधील लिमेरिक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अनेक अभ्यासांचे विश्लेषण केल्यानंतर हे तथ्य समोर आले आहे.

अभ्यासानुसार, जेवल्यानंतर 60 ते 90 मिनिटांत चालायला हवे. या काळात रक्तातील साखरेची पातळी सर्वात जास्त असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काही मिनिटांच्या चालण्यादरम्यान रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होते आणि ती सामान्य होते. यामुळे आरोग्य चांगले राहते.

'या' वेळी प्या नारळपाणी; हृदयविकार, हाय BP अशा अनेक त्रासांपासून मिळेल आराम

चालण्याचे इतर फायदे जाणून घ्या

संशोधकांच्या मते, 2-5 मिनिटे चालण्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, परंतु त्यामुळे इन्सुलिन आणि रक्तदाबावर फारसा फरक पडत नाही. यासाठी किमान ३० मिनिटे चालावे. जर तुमची क्षमता जास्त असेल तर तुम्ही 60 मिनिटे चालू शकता. रात्रीच्या जेवणानंतर असे केल्याने तुमचा रक्तदाबही नियंत्रणात राहील.

झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका

जेवणानंतर चालताना सेरोटोनिन हार्मोनदेखील सोडला जातो, ज्यामुळे झोप चांगली लागते. चालण्याने स्मरणशक्ती सुधारते, सकारात्मक विचार येतात आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात आणि मानसिक आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes, Walk