Home /News /lifestyle /

Skin care : पावसाळ्यातही कायम ठेवा चेहऱ्याची चमक, घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा फेस पॅक

Skin care : पावसाळ्यातही कायम ठेवा चेहऱ्याची चमक, घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा फेस पॅक

पावसाळ्यात दमात वातावरण आणि घामामुळे चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसू लागतो. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तुम्ही शेंगदाणा फेस पॅकची मदत घेऊ शकता.

  मुंबई, 04 जुलै : पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे (Skin Care In Rainy Season) हे आव्हानात्मक काम असते. या दरम्यान आर्द्रता आणि दमात वातावरणामुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो. अशा परिस्थितीत शेंगदाण्यांचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. पावसाळ्यात शेंगदाण्याचा फेस (Peanut Face Pack) पॅक वापरून तुम्ही चेहऱ्याची चमक सहज राखू शकता. जर तुम्हाला पार्लरमध्ये न जाता घरी तुमचे सौंदर्य वाढवायचे असेल तर तुम्ही शेंगदाणा फेस पॅक वापरू शकता. हा पॅक तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिसळून बनवू शकता. हा पॅक तुम्हाला नैसर्गिक चमक देण्यास मदत करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिटॅमिन सी आणि ई समृद्ध शेंगदाणा फेस पॅक पावसाळ्यात चेहऱ्यासाठी सर्वोत्तम क्लिन्झिंग एजंट (Cleansing Agent) सिद्ध होऊ शकतो. यासोबतच त्वचेचे कोलेजन वाढवून डागांपासून मुक्त होण्यासही हे गुणकारी आहे. जाणून घेऊया पीनट फेस मास्क बनवण्याची आणि लावण्याची पद्धत. शेंगदाणे आणि दूध चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी, शेंगदाणे आणि दुधाचा फेस मास्क (Peanut And Milk Face Mask) लावणे ही एक अतिशय प्रभावी कृती आहे. यासाठी 2 चमचे शेंगदाणे भिजवून बारीक करा. आता या पेस्टमध्ये 2 चमचे दूध आणि 3-4 थेंब गुलाबजल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेस मास्क काही दिवस लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतात.

  Skin Care : तुमच्या चेहऱ्यावरील तेज ठेवा कायम, ट्राय करा हे तीन अनोखे फेशियल; मग बघा Glow

  शेंगदाणे आणि संत्री व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानली जाणली संत्री आणि पीनट फेस मास्क (Peanut And Orange Face Mask) त्वचेच्या छिद्रांची खोलवर साफसफाई करून चेहरा मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. यासाठी 2 संत्री आणि भिजवलेले शेंगदाणे बारीक करून पेस्ट तयार करा. आता त्यात 4 चमचे दूध मिसळा आणि चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेस मास्क आठवड्यातून दोनदा लावल्याने तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. डायबेटिज रुग्णांनी असा फणस खायला हवा; ब्लड शुगर कमी करण्यासाठी ठरेल रामबाण शेंगदाणे आणि केळी शेंगदाणा आणि केळीचा फेस मास्क (Peanut And Banana Face Mask) बनवण्यासाठी 2 केळी चांगले मॅश करा. आता 2 चमचे पीनट बटर घालून चेहऱ्याला लावा आणि 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. केळी आणि शेंगदाण्यांचा फेस पॅक आठवड्यातून 2-3 वेळा लावल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Skin care

  पुढील बातम्या