Home /News /viral /

Unlock ची आनंद महिंद्रांनीही घेतली फिरकी; ट्वीट केला मजेशीर VIDEO

Unlock ची आनंद महिंद्रांनीही घेतली फिरकी; ट्वीट केला मजेशीर VIDEO

लॉकडाउनबाबत उद्योगपती आंनद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक मजेशीर ट्वीट शेअर केलं असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

    कोरोना (Coronavirus) ची दुसरी लाट हळूहळू कमी होत असताना आता सरकार लॉकडाउन (Lockdown) काही प्रमाणात शिथिल करीत आहे. विविध राज्यांमध्ये अनेक नियमांसह लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. लॉकडाउनबाबत उद्योगपती आंनद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक मजेशीर ट्वीट शेअर केलं असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी ट्वीट केल्यानंतर अनेक जण त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक करीत आहे. आनंद महिंद्रांनी ट्वीटरवर एक मजेशीर व्हिडीओ (Funny Video) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दरवाज्याला लावलेल्या टाळ्याला (लॉक) रशीने ढील देऊन खाली (डाउन) घेत आहे. आनंद महिंद्रांनी या व्हिडीओबद्दल लिहिलं आहे की, कदाचित हा जोक मुर्खपणाचा असू शकतो. मात्र मला आनंद आहे की, आपला सेन्स ऑफ ह्यूमर कायम आहे. हा या व्हिडीओ पुन्हा पाहण्याची योग्य वेळ नाही. जेव्हा प्रत्येक राज्यातील नेता त्याच्या भागात किती लॉक कमी करायचा आहे. त्यांचं ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. काही तासात या व्हिडीओला 80 हजार व्ह्युज मिळाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी केलेलं हा ट्वीट अनेकांनी रिट्वीट केलं आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी केलेलं ट्वीट नेहमीच बातम्यांमध्ये असतं. सोशल मीडियावर ते कायम मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anand mahindra, Corona virus in india, Lockdown, Video viral

    पुढील बातम्या