मुंबई 15 जानेवारी : असे बरेच लोक आहेत, ज्यांना तूपातील जेवण किंवा पदार्थ खायला आवडते. यामुळे जेवणाला चव देखील येते. तसेच तुपाचे आरोग्यासाठी बरेच फायदे देखील आहेत. थंडीत तर लोक आवर्जुन तुप खातात. कारण त्याचे शरीरासाठी खूपच फायदे आहेत. त्यामुळे डॉक्टरही ते खाण्याचा सल्ला देतात.
पण तुमच्या मनात तूप घेताना कशी शंका येते का की तुम्ही घेतल असलेल्या तूपात भेसळ तर नाही ना? सध्या सगळ्याच गोष्टींमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सहाजिकच तूपात देखील भेसळ होतच आहे. मग आता अशा परिस्थीतीत भेसळयुक्त तूप कसे ओळखायचे असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थीत राहातो.
हे हा वाचा : पपई कापताना तुम्हीही करता का या चुका? 'या' टिप्स तुमच्या फायद्याच्या
पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त तूप ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती (Ghee Purity Check Tips) सांगणार आहोत.
पाण्यातून तपासू शकता
तूप खरे आहे की भेसळ आहे हे जाणून घ्यायचे असल्यास एक चमचा तूप एका ग्लास पाण्यात विरघळवण्याचा प्रयत्न करा. जर ते तूप पाण्याच्या वर तरंगू लागले तर ते खरे आहे असे समजावे आणि तरंगण्याऐवजी ते तूप पाण्याच्या खाली बसून साचू लागले तर त्यात भेसळ झाली आहे असे मानावे.
तळहातावर घासणे
तुम्ही तुमच्या तळहातावर घासूनही तुपाची वास्तविकता जाणून घेऊ शकता. यासाठी थोडे तूप घेऊन तळहातावर चोळा. जर ते तूप चोळल्यानंतर वितळू लागले तर तुमचे तूप अगदी शुद्ध आहे असे. दुसरीकडे ते तूप वितळण्याऐवजी तळहातावर राहिले तर त्यात भेसळ झाली आहे.
तूप गरम करून तपासा
तूप गरम करून देखील तुम्ही त्याची शुद्धता तपासू शकता. यासाठी एक चमचा तूप घेऊन गरम करा. जर ते लगेच वितळले आणि तपकिरी झाले तर ते शुद्ध तूप आहे. याउलट ते तूप उशिरा वितळले आणि त्यात पिवळा रंग येऊ लागला तर समजून घ्या की त्यात भेसळ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ghee, Health, Health Tips, Healthy bones, Lifestyle