Home /News /lifestyle /

तूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर!

तूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर!

तूप तसं पौष्टिक असतंच; मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट पदार्थांसोबत तूप खाल्ल्यास त्याचा दुप्पट फायदा होतो.

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : गरम गरम वरणभातावर तुपाची धार कोणाला नाही आवडत? तूप-साखर चपातीचा रोल तर लहान मुलांचा फेवरेट असतो. डाळ-तांदळाच्या खिचडीची चवही तुपामुळे वेगळ्याच लेव्हलवर जाते आणि साजुक तुपातला शिरा खाण्यासाठी तर अगदी चढाओढच होते. तुपामुळे खाद्यपदार्थांना वेगळीच समृद्ध करणारी चव येते. तुपाचे आपल्या आरोग्यासाठीही कित्येक (Health benefits of ghee) फायदे आहेत. तूप तसं पौष्टिक असतंच; मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट पदार्थांसोबत तूप खाल्ल्यास त्याचा दुप्पट फायदा होतो. 'आज तक'ने याबाबतची माहिती दिली आहे. पित्त, कफ आणि वात अशा समस्यांसाठी तुपामध्ये कापूर मिसळणं फायद्याचं ठरतं. कापूर चवीला थोडा कडवट असतो; मात्र त्याचे औषधी गुण तुपासोबत (Ghee with camphor benefits) अधिकच उत्तमरित्या काम करतात. कापूरयुक्त तूप आपलं पचन चांगलं करतो. तसंच आतड्यांच्या आरोग्यासाठीही ते फायद्याचे असतं. यासोबतच ताप, दमा आणि हृदयाच्या गतीसंबंधी तक्रारींही दूर होण्यास मदत होते. आपण दूध-हळद हे कॉम्बिनेशन ऐकलं आहे; मात्र तूप-हळद हे कॉम्बिनेशनदेखील आपल्या आरोग्याला तेवढंच फायद्याचं (Benefits of Ghee with turmeric) असतं. वजन कमी करण्यासाठी हे उत्तम मानलं जातं. यासोबतच तुपामध्ये (Ghee for weight loss) हळद मिसळून खाल्ल्यामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यात मदत होते; तसंच हे हृदयासाठीही आरोग्यकारक असतं. शरीराच्या विविध भागातली दुखणी तूप-हळद हे कॉम्बिनेशन दूर करू शकतं, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे ही वाचा-आहारात Vitamin D च्या समावेशामुळे कमी होत आहे कोरोनाचा धोका? दालचिनीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात हे आपल्याला माहिती आहे; मात्र दालचिनीचं सेवन कसं करावं (Dalchini and Ghee health benefits ) याबाबत आपल्याला कल्पना नसते. यासाठी, एका पॅनवर थोडेसं तूप आणि दालचिनीची काडी चार-पाच मिनिटं गरम करून घ्यावी आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यावं. त्यानंतर हे तूप खाण्यासाठी वापरावं. यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसंच पोटाशी संबंधी तक्रारीही दूर होण्यास मदत होते. तूप आणि तुळस हादेखील एक उत्तम कॉम्बो आहे. तूप बनवताना एक उग्र वास येतो. त्यामुळे कित्येक जण तूप खाण्यास नकार देतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुपामध्ये तुळशीची पानं टाकल्यास (Ghee with Tulsi health benefits) हा उग्र वास नाहीसा होतो. तसंच, तुळशीचे गुणही तुपात मिसळतात. सर्दी आणि श्वसनासंबंधी आजारावर हा कॉम्बो उत्तम आहे. तसंच, शरीरातलं साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठीही हे फायदेशीर मानलं जातं. हे ही वाचा-मधुमेही रुग्णांनो हृदयाला जपा! डायबेटिज रुग्णांना हृदयाच्या आजारांचा धोका तुम्हाला गार्लिक बटर आवडत असेल, तर एकदा गार्लिक-तूप नक्कीच ट्राय करा. हेही चवीला तेवढंच चांगलं असतं; मात्र त्यासोबतच यामध्ये औषधी गुणधर्मही (Health benefits of Garlic-ghee) असतात. तुपासोबत लसूण खाल्ल्यामुळे इन्फ्लेमेशनशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते. यासोबतच उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्यांवरही ते गुणकारी ठरतं. अशा प्रकारे, विविध घटक तुपामध्ये (Ghee health benefits) मिसळून, त्याचा आहारात समावेश केल्यास तुम्ही शरीराच्या कित्येक समस्यांना दूर ठेवू शकाल.
    First published:

    Tags: Food, Ghee, Health, Health Tips

    पुढील बातम्या