• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मधुमेही रुग्णांनो हृदयाला जपा! डायबेटिज रुग्णांना हृदयाच्या आजारांचा धोका

मधुमेही रुग्णांनो हृदयाला जपा! डायबेटिज रुग्णांना हृदयाच्या आजारांचा धोका

मधुमेहामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांपैकी 65 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे हृदयरोगाशी संबंधित आहेत.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : मधुमेही (Diabetes) रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा (heart disease) धोका खूप जास्त असतो (Diabetic people prone to heart disease). अमेरिकन नॅशनल हार्ट असोसिएशनच्या (American National Heart associations ) आकडेवारीनुसार, मधुमेहामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांपैकी 65 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे हृदयरोगाशी संबंधित आहेत. एचटी न्यूजनुसार, टाइप-2 मधुमेहामुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हृदयरोगाचा धोका दोन ते चार पट जास्त असतो. तर मधुमेहामुळे मरणाऱ्यांपैकी बहुतेक मृत्यूंचं कारण हृदयरोग आहे. एका अभ्यासानुसार, मधुमेहामुळे उच्च रक्तदाब, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी वाढते. अशा व्यक्तींच्या कुटुंबातील इतरांनाही हृदयरोगाचा धोका वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोरोनरी धमन्या (Coronary arteries) कडक होणं हे हृदयरोगाचं मुख्य कारण आहे. कोरोनरी धमनी हृदयाच्या स्नायूंना रक्त वाहून नेण्याचं काम करते. यामुळे, हृदयाला ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वंदेखील मिळतात. मधुमेहामुळे त्यात कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. कधीकधी ते हृदयाकडे जाणाऱ्या नलिकेला हानी पोहोचवते. परंतु प्लेटलेट्स (Platelets) ती दुरुस्त करतात. पण जेव्हा ते असं पुन्हा पुन्हा होऊ लागतं, तेव्हा हृदयाकडे जाणारी नलिका अरुंद होता होता बंद होऊ लागते, ज्यामुळं हृदयविकाराचा झटका येतो. तसंच हृदयक्रिया बंद पडण्याचा (Heart failure) धोकादेखील वाढतो. हे वाचा - Bigg Boss15:’ये रिश्ता..’फेम शिवांगी जोशी-मोहसीन खानला बिग बॉससाठी मिळाली इतक्या कोटींची ऑफर! हृदयविकाराचा झटका (Heart attack) कसा ओळखावा? श्वास घेण्यास त्रास होतो. वारंवार चक्कर येते. जास्त आणि कोणत्याही कारणाशिवाय घाम येणे. खांदा, जबडा आणि डाव्या हातात वेदना होतात. छातीत दुखणे. अनेकदा अस्वस्थता वाटणे. हे वाचा - अजबच! बाळाचं नाव ऐकूनच सरकारला फुटला घाम; बदलण्याचे दिले आदेश, काय आहे प्रकरण? मधुमेहाचा विकार असलेल्यांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काय करावं? रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवा. रक्तदाब 120/80 च्या आसपास राखण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर, नियमितपणे औषध घ्या. कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करा. त्याची पातळी वाढली असल्यास औषध घ्या. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा. धूम्रपान, तंबाखूपासून दूर रहा.
  Published by:News18 Desk
  First published: