• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुमच्या आतल्या त्या 'बाल मनाला' कधीही मरू देऊ नका; मानसिक आरोग्य राहील उत्तम

तुमच्या आतल्या त्या 'बाल मनाला' कधीही मरू देऊ नका; मानसिक आरोग्य राहील उत्तम

Bring your inner childhood Alive : आपण सल्ला किंवा शिष्टाचाराकडं थोडं जास्तच लक्ष देणं सुरू करतो आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं बंद करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण आपल्या आतल्या 'बालमनाला' मारतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आपण आयुष्यात जसजसे मोठे होतो तसतसे आपल्यामध्ये कृत्रिमता अधिक येऊ लागते. आपण सल्ला किंवा शिष्टाचाराकडं थोडं जास्तच लक्ष देणं सुरू करतो आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं बंद करतो. आपण काळजी करू लागतो की, जर आपण आपल्याला मनाला वाटणारं हे काम केलं तर लोक त्याचा काय विचार करतील? सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण आपल्या आतल्या 'बालमनाला' मारतो. हिंदुस्थान वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका स्तंभात, होओपोनोपोनो तज्ज्ञ डॉ. करिश्मा आहुजा यांनी लिहिलं आहे की, जसे आपण मोठे होतो, आपण जीवनातील गंभीर भागात प्रवेश करतो. म्हणूनच आपण जीवनातील सहजता आणि मजा करणं विसरून जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? की चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आतील 'मुलाला' जिवंत ठेवणं किती महत्त्वाचं (Bring your inner childhood Alive) आहे? याबाबत डॉक्टर करिश्माने काही टिप्स दिल्या आहेत. ते म्हणतात की सर्वांसाठीच चांगली गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही वयात आपल्या आतील मुलाला पुन्हा जागृत करू शकतो. यासाठी तुम्हाला फार वेगळे असण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या आतील मुलाचे ऐकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा तुमच्या जीवनात आज जे काही घडत आहे त्यापेक्षा चांगले काही होऊ शकते, तुमची कल्पनाशक्ती अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकते. जिज्ञासू आणि मोकळ्या मनाचे व्हा मुले स्वभावाने खूप जिज्ञासू असतात. त्यांना काही नवीन दिसले तर ते अनुभवायचे असते. त्यांच्याकडे ती गोष्ट करण्याचा कोणताही पूर्वीचा अनुभव नसतो, म्हणून ते हे काय आहे हे शोधण्यासाठी प्रश्न विचारतात? त्यामुळे तुम्हीही लहान मुलाप्रमाणे तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक असले पाहिजे. लहान मुलाप्रमाणे नवीन कल्पना तयार करा. स्वतःला किंवा इतरांना प्रश्न विचारून दररोज काहीतरी नवीन शिकण्याचे ध्येय ठेवा. ज्यातून तुमच्यासाठी नवीन अनुभव मिळतील आणि नव्या कल्पना निर्माण करण्यात मदत होईल. हे वाचा - Aryan Drug Case : 25 कोटी खंडणीच्या आरोपावर NCB चा खुलासा, पत्र केले प्रसिद्ध लोकांना काय वाटेल.... मुले स्वतःच्या मनाला अजिबात त्रास देत नाहीत किंवा इतर त्यांच्याबद्दल काय विचार करतात यावर त्यांची ऊर्जा वाया घालवत नाहीत. म्हणूनच ते खूप सर्जनशील आणि सतर्क असतात. त्यांच्यात कोणताही दिखावा नसतो. महत्त्वाचे म्हणजे लोक तुम्ही कसेही वागलात तरी त्याची चांगली वाईट चर्चा करतातच. तुमचे एखादे काम काही लोकांना चुकीचे वाटू शकते तर काहींना बरोबर वाटू शकते. त्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामाचे प्रत्येकासमोर स्पष्टीकरण देत बसून वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही काहीही केले तरी त्याची चांगली-वाईट चर्चा होणारच तर मग तुम्हाला जे करायचे आहे ते का करू नये? इतर काय विचार करतील याचा विचार सोडा आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम करत रहा. त्यामुळं तुमची प्रेमळ आणि सकारात्मक मानसिकता तयार होईल. हे वाचा - मर्डर-2 चित्रपटातून घेतली आयडिया; कपलने तांत्रिकाच्या म्हणण्यावरुन कॉलगर्लचा दिला बळी चुकांना घाबरू नका मुले धैर्यवान असतात, त्यांना भीती नसते आणि ते मोठे जोखीम घेतात. म्हणूनच ते चालणे, धावणे, गोष्टींसह खेळणे, अनोळखी लोकांशी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करत राहतात. जरी त्यांना माहीत नसेल की ते त्यांच्याशी कसे वागतील. जोखीम न घेता किंवा काहीतरी वेगळे केल्याशिवाय आपण नक्कीच शिकू शकत नाही किंवा पूर्णपणे जगू शकत नाही. म्हणून जर तुमच्याकडे काही कल्पना असतील किंवा तुम्हाला त्याबद्दल आतून विश्वास असेल तर धाडसी व्हा. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही जिथे आहात तिथेच राहाल. परंतु, जर तुम्ही त्यावर काही काम केले तर तुम्ही तुमच्या स्वप्नांचे आयुष्य जगाल.
  Published by:News18 Desk
  First published: