मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लहान बहिणीने केलं मोठ्या बहिणीला प्रेग्नंट; गे कपलसाठी घेतला मोठा निर्णय घेणाऱ्या बहिणींची जगभर चर्चा

लहान बहिणीने केलं मोठ्या बहिणीला प्रेग्नंट; गे कपलसाठी घेतला मोठा निर्णय घेणाऱ्या बहिणींची जगभर चर्चा

एक बहीण बीजांडांचं दान करते, तर दुसरी बहीण त्याच्या साह्याने गर्भवती होते. या इंग्लिश बहिणींची जगभर चर्चा आहे. कारण दोन वर्षांपूर्वी याच गे कपलसाठी सरोगसीद्वारे (Surrogacy) बाळाला जन्म दिला होता.

एक बहीण बीजांडांचं दान करते, तर दुसरी बहीण त्याच्या साह्याने गर्भवती होते. या इंग्लिश बहिणींची जगभर चर्चा आहे. कारण दोन वर्षांपूर्वी याच गे कपलसाठी सरोगसीद्वारे (Surrogacy) बाळाला जन्म दिला होता.

एक बहीण बीजांडांचं दान करते, तर दुसरी बहीण त्याच्या साह्याने गर्भवती होते. या इंग्लिश बहिणींची जगभर चर्चा आहे. कारण दोन वर्षांपूर्वी याच गे कपलसाठी सरोगसीद्वारे (Surrogacy) बाळाला जन्म दिला होता.

लंडन, 24 मे: आजच्या युगात वैद्यकीय विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. पूर्वीच्या काळी वंध्यत्व असलेली दाम्पत्यं मूल होण्यासाठी अक्षरशः रडायची. आता मात्र अशा दाम्पत्यांनाही मूल होण्याचे अनेक मार्ग विज्ञानामुळे उपलब्ध झालेले आहेत. एवढंच नाही तर काही पाश्चिमात्य देशात समलिंगी (Gay Lgbt) जोडप्यांनाही मूल दत्तक घेण्याबरोबर स्वतःचं मूल सरोगसी आणि एग डोनरच्या साहाय्याने जन्माला घालायचा अधिकार आहे. सरोगसी  (Surrogate mother) म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं, तर दुसऱ्या दाम्पत्याचं मूल आपल्या उदरात वाढवायचं. पण सरोगसी मातृत्वाबाबत (Surrogacy of British sisters for gay couple) जगभरात सध्या चर्चा आहे इंग्लिश बहिणींची. यातल्या एकीने एग डोनेट केलंय तर दुसरी आपल्या गर्भात त्यापासूनचा गर्भ वाढवते आहे. या दोघींचही ते मूल नसेल हे विशेष. एका गे कपलसाठी या बहिणी मूल जन्माला घालणार आहेत.

सरोगसीमध्ये एका महिलेच्या पोटातील गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात रुजवून बाळाचा जन्म घडवून आणला जातो. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या दोन बहिणी सरोगसीद्वारे अन्य दाम्पत्यांच्या जीवनात आनंद भरत आहेत; पण त्यांच्याद्वारे केल्या जात असलेल्या सरोगसीची गोष्ट तितकी साधी-सरळ नाही. त्यात एक ट्विस्ट आहे.

तरुणी पडली होती प्रियांकाच्या प्रेमात; देसी गर्लनं सांगितला 'lesbian encounter'

37 वर्षांची लिएने डेव्हिस (Leanne Davis) ही महिला 34 वर्षांची तिची बहीण रेचल (Rachel) हिच्या बीजांडांच्या साह्याने गर्भवती (Pregnant) होते. म्हणजेच एक बहीण बीजांडांचं दान करते, तर दुसरी बहीण त्या बीजांडांच्या साह्याने गर्भवती होते. आत्ताही लिएने 29 आठवड्यांची गर्भवती आहे. सरोगसीद्वारे जन्मलेल्या बाळाशी दोघीही जन्मानंतर संपर्क ठेवत नाहीत. आपल्या कामावर दोघीही संतुष्ट आहेत. आपल्यामुळे कोणाच्या तरी जीवनात मुलांचा प्रवेश होतो, ही गोष्ट त्यांना आनंद देते.

आतापर्यंत या दोघी बहिणींनी एका मुलाला जन्म दिला असून, आणखी एक मूल लिएनेच्या उदरात आहे. ही दोन्ही मुलं गे म्हणजेच समलिंगी दाम्पत्याची आहेत. 47 वर्षांचा टेविस एलन आणि 31 वर्षांचा स्पेन्सर हे ते समलिंगी दाम्पत्य (Gay Couple) आहे. स्पेन्सर हा वकील आहे. या दाम्पत्याच्या स्पर्मचा (शुक्रजंतू) (Sperm) धाकट्या बहिणीच्या बीजांडांशी (Egg) संयोग घडवून आणून त्यातून तयार झालेला गर्भ मोठ्या बहिणीच्या गर्भाशयात ठेवला गेला. तिथे त्याचं पालनपोषण झालं आणि नऊ महिन्यांनी बाळाचा जन्म झाला. रूढार्थाने बाळंतपण (Delivery) मोठ्या बहिणीचं होत असलं, तरी धाकटी बहीण तिच्यासोबत कायम असते. दोघी मिळून हा काळ आनंदाने व्यतीत करतात. यातून आम्हाला खूप आनंद मिळतो, असं दोघीही म्हणतात.

Alert! तुम्हीही Domino’sमधून ऑर्डर केलाय पिझ्झा? बँक अकाउंट धोक्यात,पाहा डिटेल्स

बाळाचा जन्म होईपर्यंत दोघी एकत्र राहतात. त्यानंतर आपापल्या घरी जातात. त्या दोघांनाही स्वतःची तीन मुलंही आहेत. मोठी बहीण सिंगल मदर आहे. धाकटी बहीण आपले पती आणि तीन मुलांसह राहते.

या दोघींनी दोन वर्षांपूर्वी याच गे कपलसाठी सरोगसीद्वारे (Surrogacy) बाळाला जन्म दिला होता. सरोगसीद्वारे बाप बनलेल्या या गे कपलने या दोन्ही बहिणींना धन्यवाद दिले आहेत. या दोन्ही बहिणींमुळे आपल्या दोघांमधले संबंध अधिक दृढ व्हायला मदत झाली, असं त्या गे कपलचं म्हणणं आहे. आता लवकरच जन्म घेणार असलेल्या बाळाच्या स्वागतासाठी हे गे दाम्पत्य सुपर एक्सायटेड आहे.

First published:

Tags: Surrogacy