मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तरुणी पडली होती प्रियांकाच्या प्रेमात; देसी गर्लनं सांगितला 'lesbian encounter' चा किस्सा

तरुणी पडली होती प्रियांकाच्या प्रेमात; देसी गर्लनं सांगितला 'lesbian encounter' चा किस्सा

त्या लेस्बियन तरुणीनं तिला प्रपोज देखील केलं होतं. (Lesbian Encounter) मात्र त्यानंतर प्रियांकानं असं काहीतरी केलं की ज्यामुळं तिला तिथून पळ काढावा लागला.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 24 मे: प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपटांसोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. अनेक मुलाखतींमध्ये ती आपल्या आयुष्यातील काही गंमतीशीर किस्से सांगून प्रेक्षकांना चकित करते. असाच एक अवाक् करणारा प्रकार तिनं करण जोहरला (Karan Johar) दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. एक तरुणी प्रियांकाच्या मागे लागली होती. त्या लेस्बियन तरुणीनं तिला प्रपोज देखील केलं होतं. (Lesbian Encounter) मात्र त्यानंतर प्रियांकानं असं काहीतरी केलं की ज्यामुळं तिला तिथून पळ काढावा लागला.

प्रियांकानं काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत दीपिका पदुकोण देखील होती. करणनं दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील लेस्बियन एन्काउंटरबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना प्रियांकानं हा गंमतीशीर किस्सा सांगितला.

" isDesktop="true" id="555234" >

प्रियांका एका नाईट क्लबमध्ये गेली होती. तिथं एका सुंदर तरुणीसोबत तिची ओळख झाली. बोलता बोलता दोघांमध्ये मैत्री देखील झाली. दरम्यान ती तरुणी प्रियांकाच्या प्रेमात पडली. अन् तिनं थेट तिला रिलेशनशीपसाठी प्रपोज केलं. हा प्रकार पाहून प्रियांका सुरुवातीला गोंधळली होती. यावर काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. कारण त्या तरुणीला नाराजही करण्याची इच्छा तिला होत नव्हती. अखेर तिनं एक युक्ती केली. मी आधीच एका तरुणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे असं खोटं कारण तिनं सांगितलं. या उत्तरामुळं ती नाराज झाली अन् उदास चेहऱ्यासोबत ती निघून गेली. या मुलाखतीत प्रियांका म्हणाली मी केवळ पुरुषांनाच डेट करु शकते महिलांसोबत डेटिंगचा विचार करु शकत नाही.

First published:

Tags: Entertainment, Priyanka chopra