जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पोटात सूज असल्यास काय खावं आणि काय नाही?

पोटात सूज असल्यास काय खावं आणि काय नाही?

पोटात सूज असल्यास काय खावं आणि काय नाही?

पोटाची समस्या असल्यास तुम्ही जे काही खाल त्यामुळे एकतर तुमच्या पोटाला आराम मिळेल किंवा समस्या अधिक तीव्र होईल.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    जठरास सूजेच्या समस्येमध्ये पोटातील आतड्यांमध्ये सूज आणि आग होत असल्याची जाणीव होते. विषारी घटक, रक्तस्राव किंवा संसर्गामुळे जठराची सूज येऊ शकते. myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं की,  अचानक किंवा हळूहळू पोटात सूज येणे वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये यामुळे पोटात व्रण होतात. यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कधीकधी जठराची सूज कोणतीही लक्षणं दर्शवत नाही, पण काही बाबतीत पोटाच्या वरील भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. याशिवा ढेकर येणं, मळमळ, उलट्या होणं, पोट भरलेले वाटणं, फुगलेले पोट इत्यादी लक्षणंही दिसतात. जर गॅस्ट्राइटिस अधिक तीव्र असेल तर पोटात रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्यामुळे घाम येणं, श्वास घेण्यात त्रास होणं, अशक्तपणा, छातीत आणि पोटात दुखणं, उलट्या होणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. आठवडा किंवा त्याहून अधिक काळ अशी लक्षणं दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. हे वाचा -  हिवाळ्यातही हातपाय सतत गार आणि सुन्न पडणं फक्त थंडीचं नाही तर आजाराचं लक्षण myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की, पोटात सूज आल्यावर विरुद्ध आहार जसं दुधासह मासे, दुधासह दही आणि चहासह लसूण यांचं सेवन करू नका. भूक, तहान, लघवी, आतड्यांसंबंधी हालचाली यासारख्या नैसर्गिक कृती आणि इच्छांना दडपू नका. मसालेदार पदार्थ आणि चहा, कॉफी आणि मद्य पिऊ नका. ज्यांना पोट फुग्ण्याची समस्या आहे त्यांनी दिवसा झोपणं टाळावं. सुरुवातीच्या टप्प्यावर जर ही समस्या नियंत्रित केली गेली तर पुढे जाऊन अल्सरमध्ये रूपांतरित होण्यापासून प्रतिबंधित केला जाऊ शकतो. हे वाचा -  Vaginal discharge मध्ये बदल; ओळखा आपलं आरोग्य जर पोटात सूज येत असेल तर असे पदार्थ सेवन केले पाहिजेत ज्यात जठराची सूज बरी होण्यास आणि त्याची लक्षणं कमी होण्यास मदत होईल. यासाठी गाजर, ब्रोकोली, लापशी, सफरचंद इत्यादी उच्च तंतुमययुक्त पदार्थ खा. मासे, कोंबडी यासारखे कमी चरबीयुक्त पदार्थ खा. आपल्या खाद्यसूचीमध्ये कमी अॅसिडीटी किंवा अधिक क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करा. कॅफिन आणि कार्बोनेटेड नसलेले पेय प्या. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पोटाच्या आतड्यांना त्रास होऊ शकतो. हे पोटात पाचक रसांद्वारे नुकसान होण्याची शक्यता वाढवते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने जठराची सूज तीव्र होण्याचा धोका वाढतो. अधिक माहिती सठी वाचा आमचा लेख - पोटात सूज: लक्षणे, कारणे, उपचार… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: health , stomach
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात