व्हजायनल डिस्चार्ज (vaginal Discharge) म्हणजे योनीमार्गातून येणारं पाणी. सर्वसामान्यपणे याला व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) असं म्हटलं जातं, कारण त्याचा रंग तसा असतो. व्हाईट डिस्चार्ज, हे महिलांमध्ये सामान्य आहे. मात्र त्यामध्ये अनेक बदल होत असतात. व्हाईट डिस्चार्जमध्ये होणारे हे बदल काही वेळा सामान्य असू शकतात. तर काही वेळा गंभीर अशा समस्येचं लक्षणही असू शकतं. त्यामुळे महिलांना व्हजायना डिस्चार्जबाबत माहिती असायलाच हवी.
पांढरा, जाड डिस्जार्ज आणि खाज येत असल्यास - हे यिस्ट इन्फेक्शन (yeast infection) असू शकतं. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार व्हजायनामध्ये Candida हे बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या असतात. त्यांची वाढ जास्त झाल्यास यिस्ट इन्फेक्शन होतं. यिस्ट इन्फेक्शन झाल्यास डिस्चार्ज हा दुर्गंधयुक्त नसला तरी भरपूर प्रमाणात खाज येते.
पिवळा डिस्चार्ज - तज्ज्ञांच्या मते, सर्वाधिक दिवस जर तुम्हाला पिवळा डिस्चार्जच दिसत असेल, तर ते सामान्य आहे. कारण व्हाईट डिस्चार्ज हवेच्या संपर्कात आल्यास तो पिवळा होऊ शकतो. मात्र जर तुम्हाला पिवळ्या डिस्चार्जसह वेदना, खाज अशी समस्या जाणवत असेल तर मात्र हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं.