काही लोकांना हातात आणि बोटांमध्ये थंडपणा आणि सुन्नपणा जाणवतो. इतकंच नाही तर हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये वेदना आणि ताण आल्यासारखाही वाटतो. ही लक्षणं रेनॉड्स या (raynaud disease) आजारामुळे होऊ शकतात. वास्तविक जेव्हा शरीराच्या लहान रक्तवाहिन्या ज्या त्वचेत रक्त आणण्यासाठी कार्य करतात त्या संकुचित होतात तेव्हा रक्त त्वचेला योग्यप्रकारे पोहोचत नाही आणि अशी समस्या उद्भवते. myupchar.comशी संबंधित डॉ. आयुष पांडे यांच्या मते पुरुषांपेक्षा ही समस्या स्त्रियांना जास्त उद्भवते. याशिवाय थंड वातावरण असलेल्या क्षेत्रात राहणारे लोकही या समस्येनी अधिक प्रभावित होतात. मात्र उपचारानं ही समस्या बरी होऊ शकते. रेनॉड फेनोमेनन होण्याची कारणं जरी रेनॉड फेनोमेन्सन आजाराची कारणं अद्याप योग्यपणं शोधली गेली नसली, तरीही काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, थंडीमुळे किंवा एखाद्या प्रकारच्या तणावामुळे असं होत असावं. थंड हवामानात याचा प्रभाव अधिक दिसून येतो. सामान्य किंवा गरम तापमान असलेल्या भागात हा आजार उद्भवत नाही. याचं कारण असे आहे की, थंड वातावरणात उबदार होण्यासाठी शरीराच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्त हात आणि बोटांपर्यंत नीट पोहोचू शकत नाही, ज्यामुळे रेनॉडची समस्या सुरू होते. यामुळे हात आणि बोटांना सूज येते आणि त्यांचा रंगही कळा निळा होऊ शकतो. काय आहे याचा योग्य उपचार रेनॉड सिंड्रोम टाळण्यासाठी थंड ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे रेनॉडच्या समस्येची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. रेनॉड फेनोमेनिन रोगाच्या बाबतीत डॉक्टर योग्य औषध देतात जे रक्तवाहिन्या पसरवून रक्त परिसंचरण वाढवतात. रेनॉड फेनोमेनॉनवर उपचार करण्यासाठी डॉक्टर काही रासायनिक इंजेक्शन्स देखील देऊ शकतात. तसंच शस्त्रक्रिया देखील करता येते. myupchar.com शी संबंधित डॉ. आयुष पांडे यांच्या मते, जर रेनॉड फेनोमेनॉनमध्ये रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. यात शिराची शस्त्रक्रिया समाविष्ट आहे. घरगुती उपचारानंदेखील याचं निवारण होतं रेनॉड रोगात लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर दररोज सुमारे 40 मिनिटांसाठी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम केला तर त्वरित फायदा होईल. हृदयाच्या व्यायामामध्ये चालणं, धावणं, पोहोणं यासारख्या व्यायामाचा समावेश आहे. याशिवाय घरी 10 ते 15 मिनिटांपर्यंत दोरी उड्या मारणं किंवा सायकल चालवणंही फायदेशीर आहे. जर रक्त शरीरात पातळ राहिलं आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी राहिलं तर रेनॉडच्या आजाराचा धोका कमी होतो. म्हणून कमी चरबीयुक्त आहार घ्यावा. तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावे. दररोज सकाळी कच्च्या लसणाची कळी खावी यानं अधिक फायदा होईल. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - रेनॉड्स फिनॉमेना: लक्षणे, कारणे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.