मुंबई, 19 फेब्रुवारी: उत्तम आरोग्यासाठी (Health) योग्य आहार (Diet) महत्त्वाचा असतो. अलीकडच्या काळात चुकीच्या आहारामुळे आरोग्यविषयक समस्या वाढल्याचं दिसून येतं. त्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्वसमावेशक आहार गरजेचा आहे. तसंच वयाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य पदार्थांचं सेवनही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारातील अन्नपदार्थ अधिक चविष्ट बनवण्यासाठी लसणाचा (Garlic) वापर केला जातो. खरं तर रोज लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसणामुळे अनेक आजार दूर ठेवता येतात. विवाहित पुरुषांच्या आरोग्यासाठी तर लसूण हा सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे. जे पुरुष लैंगिक समस्यांचा (Sexual problems) सामना करत आहेत, त्यांनी रोजच्या आहारात लसूण समाविष्ट करावा, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात. लसणात एलिसीन (Allicin) नावाचे औषधी तत्व असते. यात अँटिऑक्सिडंट, अँटिफंगल आणि अँटिव्हायरल गुणधर्म असतात. तसंच लसणात व्हिटॅमिन बी आणि सी, सेलेनियम, मँगेनीज, कॅल्शियम मुबलक असतं. हे सर्व घटक आरोग्यसाठी पूरक असतात. लसणातील अनेक औषधी गुणधर्म आजार दूर ठेवण्यास मदत करतात. रोज लसूण खाण्यासाठी तसे विशेष काही नियम नाहीत. कोणत्याही वेळी तुम्ही लसूण खाऊ शकता. परंतु, रिकाम्यापोटी लसूण खाणं अधिक फायदेशीर असतं. सकाळी झोपेतून उठल्यावर लसणाच्या दोन पाकळ्या तुम्ही खाऊ शकता. एका दिवसात तुम्ही चार ग्रॅम कच्चा लसूण खाऊ शकता. तसेच भाज्यांमध्ये लसणाच्या पाच ते सात पाकळ्या टाकू शकता, असं तज्ज्ञ सांगतात. हे वाचा- फळं-भाज्या खरेदी करताना या गोष्टी ध्यानात ठेवा; नेहमी मिळेल फ्रेश, ताजा माल खरं तर, लसणाचा सर्वाधिक वापर पावसाळ्यात (Rainy season) केला जातो. घसा किंवा पोटदुखीसारख्या समस्यांसाठी लसणाचा वापर केला जातो. लसणात अँटिसेप्टिक (Antiseptic) गुणधर्म असतात. त्यामुळे पोटात जंत झाल्यास कच्चा लसणू खाल्ल्याने आराम मिळतो. सर्दी, कफ, खोकला अशा आजारांवरही लसूण गुणकारी मानला जातो. हे वाचा- वायू प्रदूषणामुळे होतोय Sperm Quality वर परिणाम; संशोधकांचा मोठा दावा लसणात अॅफ्रोडिसिअॅक (Aphrodisiac) असते. लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी हा घटक महत्त्वाचा असतो. तसंच लसणात एलिसीन नावाचा पदार्थ असतो. यामुळे पुरुषांचे हॉर्मोन चांगले राहतात. तसेच लसणामुळे पुरुषांमधला इरेक्टाइल डिस्फंक्शनचा (Erectile Dysfunction) धोका कमी होतो. लसणातील व्हिटॅमिन आणि सेलेनियम स्पर्मची गुणवत्ता चांगली होते. याशिवाय लसणाचे आणखीही काही फायदे आहेत. लसणामुळे पचनशक्ती सुधारते. सर्दी, फ्लू सारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठीदेखील लसणाचा उपयोग होते. त्यामुळे रोजच्या आहारात कच्चा लसूण तसेच भाज्यांमध्येही त्याचा समावेश असावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.