जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फळं-भाज्या खरेदी करताना या सोप्या गोष्टी ध्यानात ठेवा; नेहमी मिळेल फ्रेश, ताजा माल

फळं-भाज्या खरेदी करताना या सोप्या गोष्टी ध्यानात ठेवा; नेहमी मिळेल फ्रेश, ताजा माल

फळं-भाज्या खरेदी करताना या सोप्या गोष्टी ध्यानात ठेवा; नेहमी मिळेल फ्रेश, ताजा माल

बाजारातून भाजी किंवा फळं आणायला गेलात तर, अनेकदा काय ताजं आहे आणि काय लवकर खराब होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येत नाही. जाणून घेऊ, भाज्या आणि फळं ताजे (Fresh fruit & vegitables) आहेत की नाहीत हे कशा प्रकारे समजेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : हल्ली आपल्या सर्वांची जीवनशैली (Lifestyle) खूप धावपळीची बनली आहे. तरीही आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला फिट (Fit Health) ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच लोक फिट राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतात. सध्याच्या जीवनशैलीमुळं लोकांकडे वेळ कमी असतो. त्यामुळं लोक ऑनलाइन वस्तू ऑर्डर (Online delivery) करू लागले आहेत. पण तुम्ही बाजारातून भाजी किंवा फळं आणायला गेलात तर, अनेकदा काय ताजं आहे आणि काय लवकर खराब होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येत नाही. जाणून घेऊ, भाज्या आणि फळं ताजे (Fresh fruit & vegitables) आहेत की नाहीत हे कशा प्रकारे समजेल. फणस खरेदी करण्याच्या टिप्स टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा तुम्ही फणस खरेदी कराल तेव्हा त्याची साल दाबून पहा. जर फणस पिकलेला असेल तर त्याची साल मऊ आणि कच्ची असेल. तसंच फणसाच्या सालीवर टिचक्या मारून बघा. त्यातून मंद आवाज आला तर (टणक वस्तूवर टिचक्या मारल्यासारखा आवाज आला नाही तर) तो फणस पिकलेला असतो. टोमॅटो खरेदीसाठी टिप्स टोमॅटो जास्त काळ साठवायचा असेल तर हलके कच्चे असलेले टोमॅटो घ्या. जर टोमॅटो हाताला मऊ लागत असेल तर तो जास्त काळ टिकणार नाही किंवा खराब झाला आहे हे लक्षात घ्या. हलकासा रंग असलेले टोमॅटो विकत घ्यावेत. खजूर खरेदी करण्यासाठी टिप्स जेव्हा तुम्ही खजूर खरेदी करता तेव्हा त्यावर जास्त सुरकुत्या नाहीत, याची खात्री करा. खजूर जास्त वाळवल्यास त्यावर जास्त सुरकुत्या येऊ लागतात. खजूर थोडा चकचकीत दिसला पाहिजे. तरच तो दीर्घकाळ खाण्यायोग्य राहतो. तसंच खजूरांवर साखरेचे स्फटिक किंवा पांढरे डाग नाहीत याची खात्री करा. ते खराब होऊ लागले असल्याचं हे लक्षण आहे. हे वाचा -  Fruit with Meals: आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण लसूण खरेदी करताना लसूण खरेदी करताना त्याला फार तीव्र वास नसावा, हे लक्षात ठेवा. यासोबतच जर त्याची साल पांढरी दिसत असेल, पण वास आतून खूप येत असेल तर, तो कधीही विकत घेऊ नये. लिंबू खरेदी करताना लिंबू खरेदी करताना त्याचं वजन आधी पाहिलं पाहिजे. लिंबं वजनाला हलकी लागली आणि ती मोठे असतील, तरी त्यात रस निघत नाही. लिंबाच्या देठाच्या ठिकाणी खोलगटपणा असावा. अशा लिंबांमध्ये अधिक खनिजं/क्षार असतात. हे वाचा -  Fruits-Vegetables Tips: फळं-भाज्यांच्याबाबतीतील ही एक चूक अनेकांच्या घरी करतात; नंतर औषधांवर होतो खर्च अ‌ॅव्होकॅडो खरेदीच्या टिप्स अ‌ॅव्होकॅडो घेताना लक्षात ठेवा की, त्याची वरची साल हिरवी असावी. यासोबतच याच्या शेलमध्ये काळे रॅशेस नसावेत. जर कोणत्याही अ‌ॅवोकॅडोची बाहेरची साल खूप काळी दिसली तर समजून घ्या, की ते आतून खराब होऊ लागलेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात