नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: वायू प्रदूषणाचा (Air Pollution) शुक्राणूंच्या गुणवत्तेवर (Sperm Quality) परिणाम होऊ शकतो, असं चीनमधल्या 30 हजारांहून अधिक पुरुषांच्या शुक्राणूंवर केलेल्या एका नव्या संशोधनातून (Research) दिसून आलं आहे. विशेषतः वायू प्रदूषणाचा सर्वांत वाईट परिणाम शुक्राणूंची संख्या आणि त्यांच्या हालचालींवर दिसून आला. हवेतील द्रव्य कणांचा आकार जितका लहान तितके ते मानवी शरीरासाठी अधिक धोकादायक असल्याचं या संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनांमधूनदेखील ही बाब अधोरेखित झाली होती.
एका सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असंही दिसून आलं आहे की, हवा प्रदूषित करणाऱ्या कणांचा आकार जितका लहान असेल तितकी शुक्राणूंची गुणवत्ता खराब होते. तसंच, वायू प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या मोठ्या कणांपेक्षा लहान कण अधिक हानिकारक असल्याचं संशोधनाच्या निष्कर्षातून स्पष्ट झालंय. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे परिणाम पुरूषांनी त्यांच्या तारुण्यात वायू प्रदूषणापासून दूर राहण्याची गरज असल्याचं आणखी एक कारण अधोरेखित करतात. वायू प्रदूषण आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेचा थेट संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्याचा संशोधक बराच काळ प्रयत्न करत आहेत. वायू प्रदूषणाचा संपूर्ण लोकसंख्येच्या प्रजननक्षमतेवर वाईट परिणाम होतो, हे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनातूनही असेच परिणाम समोर आले होते.
हे वाचा-Nude Sleeping: न्यूड स्लीपिंगने तुमच्या आयुष्यात होतात आश्चर्यकारक बदल!
शांघायमधल्या टोंगजी युनिव्हर्सिटीतील (Tongji University) स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी चीनमधल्या (China) 340 शहरांमधल्या सरासरी वय 40 वर्ष असलेल्या एकूण 33,876 पुरुषांचं डाटा रेकॉर्ड पाहिलं. त्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वेगवेगळी होती आणि ज्यांच्या पत्नी असिस्टेड रिप्रॉडक्शन टेक्नोलॉजीच्या (Assisted Reproduction Technology) मदतीने गर्भवती झाल्या होत्या अशा पुरुषांच्या डाटाचा अभ्यास करण्यात आला होता. संशोधनात असं आढळून आलं की, विशेषतः वायू प्रदूषणात, जेव्हा द्रव्य कण 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो, तेव्हा त्याच्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सर्वाधिक खालावते. तर 10 मायक्रोमीटर आकाराच्या द्रव्य कणांमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेत घट थोडी कमी होते. द्रव्य कण जितके लहान असतील तितके ते मानवी फुफ्फुसात खोलवर जाण्याची शक्यता असते.
हे वाचा-आत्तापर्यंत तुम्ही Single का आहात? या 5 गोष्टींमधून त्याचं उत्तर येईल समोर
गेल्या काही वर्षांत, अनेक संशोधनांमध्ये वायू प्रदूषण आणि शुक्राणूंची गुणवत्ता यांच्यात संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, सर्व वैद्यकीय तज्ज्ञ या संशोधनाच्या परिणामांशी सहमत नाहीत. असं असलं तरीही, 30 हजारांहून अधिक पुरुषांवर केलेल्या संशोधनातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा शोध निबंध वायू प्रदूषण आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेचा संबंध असल्याचा दावा करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.