नवी दिल्ली,06 ऑगस्ट : घरामध्ये भाज्या उगवायची सवय आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर (Health Benefits) आहे. यामुळे ताज्या आणि केमिकल फ्री (Fresh & Chemical Free) भाज्या मिळतात. शिवाय पुन्हा पुन्हा बाजारात जाण्याचा त्रासही वाचतो. यामुळेच आजकाल घरांमध्ये भाजीपाला पिकवण्याचा ट्रेंड(Trend)वाढत आहे. आरोग्याच्या दृष्टीने बागकाम (Gardening)करणंही चांगलं आहे.
बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक (Chemical) घटक असतात. म्हणूनच घरी पिकवलेला भाजीपाला चवीला चांगला असतो. किचन गार्डनमुळे (Kitchen Garden) घराभोवती वातावरणही चांगलं राहतं. इतर अनेक भाज्यांप्रमाणे बटाटेही (Potato) घरच्याघरी उगवता येतात. रोजच्या जेवणात बटाटा वापरला जातो. त्यामुळे या टिप्स वापरून घरीच बटाटे पिकवू शकता.
(आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास)
चांगल्या क्वालिटीचं बियाणंबटाटे उगवण्यासाठी चांगल्या प्रतीचं बियाणं घ्यायला हवं. बियाणं चांगलं असेल तरच जास्त बटाटे मिळतील. ऑनलाईन किंवा बाजारातही बियाणं मिळू शकतं.याशिवाय बटाट्यांवर आलेले कोंब कापून त्यापासूनही बटाटे पिकवता येतात.
(धक्कादायक! दारूमुळे बळावतोय कॅन्सर; वर्षभरातच सापडले सात लाखांपेक्षा जास्त रुग्ण)
उन्हाच्या ठिकाणी ठेवा
बटाटे गार्डनमध्ये मातीत किंवा एखाद्या मोठ्या कुंडीत किंवा कंटेनरमध्ये लावू शकता. पण, पुरेसा सूर्यप्रकाश असायला हवा. कोणत्याही रोपाला चांगलं ऊन किंवा सूर्यप्रकाश मिळाला की ते चांगले वाढतात. सावलीच्या ठिकाणी बटाटे लावले तर वाढणार नाहीत.
अंतर ठेवा
बटाटे चांगले यायला हवे असतील तर, बियाणं लावताना पुरेस अंतरावर ठेवा. जास्त किंवा कमी अंतर राहणार नाही याची काळजी घ्या.
(घरात झाला उंदरांचा सुळसुळाट; ‘या’ 5 उपायांनी करा बंदोबस्त)
तण वाढू देऊ नका
बटाटे पेरल्यावर त्यांची योग्य काळजी घ्यावी लागते. जमिनीमध्ये चांगल्या प्रतीचं खत मिसळा त्यामुळे बटाट्यांची वाढ चांगली होईल. जमिनीत किंवा कुंडीत बटाटे लावले तरी त्याच्या भोवती तण वाढू देऊ नका. वेळोवेळी वाढलेलं गवत काढून टाका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.