घरात उंदीर वाढले तर, घरातल्या वस्तू खराब करतात, नासधूस करतात. भितींही पोखरतात शिवाय आजारांनाही कारणीभूत ठरतात. उंदरांना घरामधून पळवून लावणं हाच एकमेक उपाय त्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी उपयोगी ठरतो.
2/ 7
उंदरांसाठी पुदिन्याचं तेल वापरता येऊ शकतं. पुदिन्याच्या तेलात बरेच औषधी गुणधर्म असतात. याचा वापर उंदरांना पळवण्यासाठीही करू शकता.
3/ 7
पुदिना तेलाला अतिशय तीव्र वास असतो. त्यामुळे उंदीर पळून जातात. यासाठी कापसाच्या बोळ्यावर पुदिन्याचं तेल लावून त्यांच्या बिळाजवळ ठेवा किंवा ज्या ठिकाणी उंदीर येतात तिथे सोडा, उंदीर पळतील.
4/ 7
गाईचं शेणही वापरू शकता. उंदरांमुळे हैराण झाले असाल तर, गायीचं शेण उंदरांच्या बिळाजवळ ठेवा.
5/ 7
उंदरांना कांद्याचा वास सहन होत नाही. त्यामुळे उंदीर येण्याच्या ठिकाणी किंवा बिळाजवळ कांदे कापून ठेवा.
6/ 7
उंदरांना पळवण्यासाठी मांजर पाळा. आवडत असेल तर, घरात मांजर पाळू शकता. मांजरीच्या आवाजाला घाबरून उंदीर पळून जातील.
7/ 7
लाल मिरचीची पावडर उंदीर पळवण्यासाठी वापरू शकता. हा अगदी सोपा उपाय आहे. मिरची पावडर किंवा सुकलेल्या लाल मिरच्या उंदरांच्या बिळाजवळ ठेवा उंदीर बाहेरच येणार नाहीत.