मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बुद्धिदेवतेचे 'हे' 5 गुण आत्मसात केलेत, तर सहज गाठता येईल यशाचं शिखर

बुद्धिदेवतेचे 'हे' 5 गुण आत्मसात केलेत, तर सहज गाठता येईल यशाचं शिखर

गणेशाकडे असणारे हे पाच गुण आयुष्यात खूप महत्त्वाचे. ते आत्मसात केलेत तर नाही येणार अपयश

गणेशाकडे असणारे हे पाच गुण आयुष्यात खूप महत्त्वाचे. ते आत्मसात केलेत तर नाही येणार अपयश

गणेशाकडे असणारे हे पाच गुण आयुष्यात खूप महत्त्वाचे. ते आत्मसात केलेत तर नाही येणार अपयश

मुंबई, 28 ऑगस्ट: हिंदू संस्कृतीमध्ये ३३ कोटी देवतांचा उल्लेख केला आहे; पण कोणत्याही देवतेची पूजा करताना सर्वप्रथम बुद्धीची देवता असणाऱ्या गणपतीचं (Lord Ganesh) पूजन केलं जातं. म्हणूनच ‘आधी वंदू तुज मोरया’ असं म्हटलं जातं. देवतांची पूजा आणि आरती करताना आपण त्यांच्या गुणांचा गौरव गातो. गणपतीमध्ये इतर देवतांच्या तुलनेत अधिक असे खास गुण (Lord Ganesh Qualities) आहेत. गणपतीकडे असणारे काही गुण अंगी बाणवले, तर लवकरच आपण यशाचं शिखर (Lord Ganesh Qualities for success) गाठू शकतो. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्या निमित्ताने, गणपतीच्या पाच खास गुणांविषयी येथे माहिती देत आहोत.

कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणं

गणपतीकडून मिळणारी सर्वांत चांगली शिकवण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणं. आयुष्यात कशीही परिस्थिती असली, तरी त्यातूनही आनंदी (Always stay happy) राहण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. गणपतीला नेहमीच आनंदी असणारी देवता म्हणून ओळखलं जातं. गणपतीचा हा गुण तुम्ही बाणवला, तर वाईट परिस्थितीलाही तुम्ही चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकाल.

धैर्यशील बना

गणपतीचा दुसरा सर्वांत मोठा गुण म्हणजे हा देव धैर्यशील आहे. कोणत्याही बिकट प्रसंगाला धैर्यानं सामोरं जाणं गरजेचं असतं. अगदी छोट्या छोट्या अवघड परिस्थितीमध्येही कित्येक जण आपला धीर गमावून बसतात. तसंच, धीर गमावल्यामुळे ते या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाहीत. असं न करता, धैर्याने संकटाला तोंड (Face danger with courage) दिल्यास तुम्ही लवकरात लवकर कठीण प्रसंगातून बाहेर पडू शकाल.

पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे

चित्त शांत ठेवणं

गणपतीकडून शिकण्यासारखा तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे चित्त शांत (Keep Steady mind) ठेवणं. मनामध्ये चलबिचल होत असताना किंवा मन ताळ्यावर नसताना घेतलेले निर्णय घातक ठरतात. मन शांत असेल, तर तुम्ही योग्य ते निर्णय घेऊ शकता. त्यामुळेच आपलं चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.

भेदभाव करू नका

गणपतीची एक खासियत म्हणजे त्याने कधीही लहान-मोठा असा भेदभाव केला नाही. तो सर्वांना समान वागणूक देतो. जेवढा त्यांना नंदी प्रिय होता, तेवढाच मूषकराजही प्रिय होता. आपणही आपल्या आयुष्यातल्या सर्व व्यक्तींना समान वागणूक (Never discriminate) देणं गरजेचं आहे. तसंच, सर्वांचा आदर करणंही गरजेचं आहे.

चांगल्या-वाईटाची जाण ठेवा

गणपतीकडून शिकण्यासारखा पाचवा गुण म्हणजे सद्सद्विवेकबुद्धी. चांगलं काय आहे, वाईट काय आहे याची जाण असणं गरजेचं (Qualities for success) असतं. आपलं एखादं काम करण्यासाठी योग्य मार्ग वापरायचा की चुकीचा शॉर्टकट वापरायचा याचा योग्य तो निर्णय घेता येणं गरजेचं आहे.

पुढचे 3 वर्षे ‘या’ 4 राशींसाठी सुखाचा काळ; मिळणार शनिदेवांची कृपादृष्टी

अशा प्रकारे गणपतीचे हे काही खास गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच प्रत्येक जण यशाचं शिखर गाठू शकेल.

First published:

Tags: Ganesh chaturthi