Home /News /lifestyle /

Video या पद्धतीने तयार केले तर कधीच फुटणार नाहीत उकडीचे मोदक; पाहा सोप्या ट्रिक्स

Video या पद्धतीने तयार केले तर कधीच फुटणार नाहीत उकडीचे मोदक; पाहा सोप्या ट्रिक्स

GANESH CHATURTHI : उकडीचे मोदक बिघडणं ही सगळ्याच महिलांची तक्रार असते. पण, मधूराने (Madhuras Recipe) सांगितलेल्या पद्धतीने उकड घेतली तर मोदक बिघणार नाहीत.

    दिल्ली, 7 सप्टेंबर :  गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हणजे लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवेद्य हवाचं. सुबक, सुंदर, भरपूर सारण भरलेल्या मोदकांवर ताव मारायला कोणाला आवडत नाही. गरम गरम मोदकांवर तुपाची धार सोडून खाण्याचा आनंद अवर्णनीय असतो. जरी घरी गणपतीचं आगमन होणार नसलं तरीही गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात मोदक (Modak recipe in Marathi) तयार होतातच. मोदक तयार करण्यासाठी 2 वेळा उकड घ्यावी लागते. एकदा पीठ उकडावं लागतं तर, मोदकांनाही उकड घ्यावी लागते. पिठाला चांगली उकड दिली तर, मोदक छान वळता येतात. पण, बऱ्याच गृहिणींची हिच तक्रार असते त्यामुळे मोदकांना उकड कशी घ्यायची म्हणजे न फुटणारे आणि पटकन वळणारे मोदक तयार होतील Madhuras Recipe मध्ये सांगितलं आहे. मोदकांसाठी रोजच्या वापरातील तांदूळ वापरण्यापेक्षा बासमती किंवा आंबेमोहर वापरावा. खूप दिवसआधी दळून आणलेलं पिठ वापरू नये. पिवळ्या रंगाचा गुळ वापरावा आणि थोडी साखर घातली तर, सारण फळफळीत होतं. मोदकाच्या पिठाची उकड दिड कप तांदळाची पिठी, चिमूचभर मीठ, त्यात 1 चमाचा साजूक तूप, पाव कप दूध आणि पाणी घालून घट्टसर मळा. हा गोळा चांगला एकजीव करा. आता स्टिमरच्या भांड्यात केळीचं पान किंवा सुती कापड ठेऊन त्यावर हा गोळा ठेऊन 10 मिनीट वाफ घ्यावी. 2 1 वाटी पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात अर्धा चमचा मीठ, एक चमचा तेल घाला. 1 चमचा साखर घाला. उकळत्या पाण्यात पीठ घालून ढवळा. त्यावर झाकण ठेऊन गॅस बंद करा. (चाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन) सारण तव्यावर एक चमचा खसखस घालून थोडी भाजवी, त्यात 2 कप खोबरं घालून थोडं परता. त्यातील मॉश्चर निघून गेल्यावर त्यात 1 कप गुळ घालावं. आवडी प्रमाणे ड्रायफ्रुट घाला. चांगलं परतून घ्या. थोडावेळ परतल्यावर गुळ विरघळेल. त्यातनंतर आणखीन 4 मिनटं परता. गॅस बंद करून जायफळ घाला. (देवघरातील पितळी मूर्ती काळ्या पडल्यात? या घरगुती उपायांनी होतील चमकदार) थोडी कोमट झालेली उकड पाण्याचा हात घेऊन मळा. मोदकाचं पिठ झाकून ठेवावं. लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी त्याची खोलगट वाटी तयार करावी. त्यात सारण घलावं. छान पाकळ्या तयार कराव्यात. मोदकपात्रात केळीचं पान ठेवावं काही लोक हळदीचं पानंही ठेवतात. मोदक मोदकपात्रात ठेवावेत. त्यावर केशराचं दूध घालावं. मध्यम आचेवर 10 मिनीटं वाफ द्यावी.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Culture and tradition, Food, Ganesh chaturthi

    पुढील बातम्या