Home /News /lifestyle /

कोरोना काळात धोकादायक ठरू शकतात असे Fungus diseases

कोरोना काळात धोकादायक ठरू शकतात असे Fungus diseases

गेल्या काही दिवसांत कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये हा फंगल इन्फेक्शन (Fungal infection) मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

    मुंबई, 11 मे : देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच आता एका नव्या आजारानं डोकं काढलं आहे. याचं नाव आहे म्युकरमायकोसिस (mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराचा (Fungal infection) संसर्ग. हा आजार आधी भारतात व्हायचा मात्र याचं प्रमाण खूप दुर्मिळ होतं. देशात वर्षभरात फारतर चार-पाच प्रकरणं आढळायची. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये हा आजार झपाट्यानं पसरतो आहे. प्रामुख्याने हवा, पाणी, हवेतील प्रदूषण, माती, भाजी, खतं, रोपं आणि फळं हे बुरशीचे (Fungus disease) सुवाहक आहेत. या माध्यमातून बुरशी आपल्या मानवी शरीरात प्रवेश करते. असं म्हणतात, म्युकोरमायकोसिस ही बुरशी आपल्या नाकात आणि घशात कायम असते. मात्र ती शरीराच्या आत गेली आणि पसरली तर जीवघेणी ठरू शकते. ही बुरशी आपल्या शरीरातील अनेक अवयवांचे कायमस्वरुपी नुकसान करू शकते. पण ही बुरशी अधिक तर डोळ्यांना लक्ष्य करते. त्यामुळे देशात कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक जणांचे डोळे काढून टाकण्याची वेळ या बुरशीजन्य आजारामुळे आली आहे. बुरशी म्हणजे परजीवी वनस्पती बुरशी म्हणजे परजीवी वनस्पतीचे छोटे छोटे रोपटं. ते क्लोरोफिल होत नाही, त्यामुळे ते गोठतात किंवा विकसित होतात. मात्र त्यांनी मानवी शरीरात प्रवेश केल्यास ते गंभीर नुकसान करतात. बुरशीचे फायदे आणि नुकसान बुरशीचे काही फायदे आहेत आणि नुकसानदेखील आहे. बुरशी कार्बनिक वस्तूंना नष्ट करते. ब्रेड (bread), दारू आणि पनीर (paneer) बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. सोबतच अनेक औषधांच्या (medicines) निर्मितीसाठी बुरशी वापरतात. एका हिरव्या रंगाच्या पेनिसीलियम नावाच्या बुरशीपासून पेनिसीलीन नावाचं औषध बनवलं जातं, ते अनेक आजारांवर फायदेशीर आहे. हे वाचा - साधं कृमीनाशक औषध Ivermectin संपवू शकतं कोरोनाची महासाथ; शास्त्रज्ञांचा दावा मशरूम, गोरल्स यासारख्या काही बुरशीचा जेवणात वापर केला जातो. मात्र काही बुरशी विषारी असतात. बुरशीमुळे त्वचेसंबंधीत आणि इतरही अनेक आजार होतात. बऱ्याचदा त्वचेचे आजार केवळ बुरशीमुळे होतात. कोरोनाकाळात अनेक बुरशीजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. यातील काही बुरशीजन्य आजार हे केवळ रुग्णालयात आढळतात तर काही एका विशिष्ट भागात प्रदेशात आढळतात. तुम्ही तिथे गेल्यास ते आजार होऊ शकतात. जाणून घेऊयात त्यांचे प्रकार आणि प्रदेश. सामान्य फंगस इन्फेक्शन फिंगरनेल्स इन्फेक्शन – हे इन्फेक्शन बोट किंवा नखातील फंगस इन्फेक्शनमुळे होतं. व्हजायनल कँडिडायसिस - हे योनीमध्ये फंगस इन्फेक्शन झाल्यास होतं. रिंगवर्म – यामुळे त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. कँडिला इन्फेक्शन – फंगसमुळे होणारं हे इन्फेक्शन तुमच्या तोंडात, घशात अथवा फुफ्फुसात होऊ शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास ते शरीरातील अवयवांवर आणि श्वसनयंत्रणेवर परिणाम करू शकते. काही विशिष्ट भागात आढळणारे बुरशीजन्य आजार ब्लास्टोमायकोसिस - अमेरिका आणि कॅनाडाच्या ओलसर जमिनीवाल्या भागात एक विशिष्ट फंगस आढळतो. तुम्ही तिथं गेल्यास तुम्हाला त्याचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यापासून आजार होऊ शकतात. क्रिप्टोकोकस गट्टी इन्फेक्शन - हे फंगस उष्ण कटिबंधीय भागात आढळतं. विशेषत: अमेरिकेच्या पॅसिफिक आणि ब्रिटीश कोलंबिया भागात राहणाऱ्या लोकांना याचा त्रास होतो आणि तिथं जाणाऱ्या लोकांनाही याची लागण होऊ शकते. कोसिडियोमायकोसिस - याला व्हॅली फिव्हरही म्हणतात. ही बुरशी दक्षिण अमेरिकी राज्यं, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारे विशिष्ट प्रकारचे आजार पसरवते. हिस्टोप्लासमोसिस –हे इन्फेक्शन हिस्टो प्लाझ्मासाख्या फंगसमुळे होतं. ही बुरशी हवेतच असते चिमण्या किंवा वटवाघूळ यांच्या माध्यमातून पसरते. रोगप्रतिकारक शक्ती कमजोरअसणाऱ्यांसाठी बुरशीजन्य आजार धोकादायक  अस्परगिलयोसिस – हा असा फंगस आहे जो घरात आणि घराबाहेर आढळतो. इम्युनिटी कमी असणाऱ्यांना याचा त्रास होऊ शकतो. कँडिडाओसिस – हा फंगस रुग्णालयात आढळतो. तुम्ही विविध प्रकारची औषधं घेत असाल तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. इनव्होसिव्ह कँडिडियोसिस – हा आजार रुग्णालयात भरती असणाऱ्यांना होतो. हा तुमच्या मेंदू, रक्त, डोळे आणि हाडात शिरतो आणि त्यांचे नुकसान करतो. हे वाचा - Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर मोफत होणार उपचार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा जगभरात विविध प्रकारचे फंगस आढळतात. ते आपल्या शरीरात शिरून नुकसान करू शकतात. इम्युनिटीदेखील कमजोर करतात. काही फंगस तर इतके गंभीर आजारी करू शकतात की त्यावर उपचार होणंही कठीण असतं.
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Serious diseases

    पुढील बातम्या