मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना? असे ओळखा बनावट पदार्थ

दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना? असे ओळखा बनावट पदार्थ

दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना?

दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना?

दिवाळी काही दिवसांवर आल्याने तुम्हालाही मिठाई खरेदी करण्याची घाई झाली असेल. मात्र, खरेदी करताना त्यात भेसळ तर नाही ना? हे कसे ओळखणार?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 ऑक्टोबर : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र मिठाईची दुकाने सजलेली दिसत आहेत. या दिवसात लोकांमध्ये विविध प्रकारच्या मिठाईंना खूप मागणी असते. या संधीचा गैरफायदा घेत अनेक दुकानांमध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री सुरू होते. प्रत्येक सणाला अशी भेसळयुक्त मिठाई पकडल्याच्या बातम्याही तुम्ही वाचल्या असतील. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. भेसळयुक्त मिठाई ह्या दिसायला सारख्याच असतात. त्यामुळे घेताना आपल्याही लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला नकली मिठाई कशी ओळखता येऊ शकते ते सांगणार आहोत.

बनावट मिठाई अशी ओळखायची?

भेसळयुक्त मिठाई शोधण्यासाठी, दोन मिठाईचे वेगळे नमुने घ्या आणि दोन्ही गरम पाण्याच्या वेगळ्या भांड्यात ठेवा. यानंतर, वेगवेगळ्या रंगाचे आयोडीन घ्या आणि या मिठाई असलेल्या भांड्यात ठेवा. जर गरम पाण्याच्या भांड्यात मिठाई विरघळली आणि त्याचा रंग बदलला, तर त्याचा अर्थ मिठाईत भेसळ आहे. रंग तसाच राहिला तर मिठाई तुम्ही बिनधास्त खाऊ शकता.

वाचा - मीठ, साखर किती खावं? डायबिटीज होऊ नये म्हणून WHO कडून महत्त्वाच्या हेल्थ टिप्स

अशा प्रकारे रंगीत मिठाई तपासा

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत रंगीत मिठाईही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बर्‍याच मिठाईंचा रंग भडक असतो, त्यामुळे ते पाहताच लक्षात येतात. कारण त्यांचा रंग चमकदार लाल असतो. पण, सर्वाधिक भेसळयुक्त रंगाचा धोका पिस्त्याच्या मिठाईत असतो. जर लाडू वगैरेंचा रंग पूर्णपणे वेगळा वाटत असेल तर घेणे टाळावे. त्याच बरोबर मिठाई थोडी दाबून पाहा जर हाताला रंग लागला तर समजावे की भेसळ आहे. त्यामुळे हलक्या रंगाची मिठाई घेण्याचा प्रयत्न करा.

चांदीचा वर्ख कसा ओळखाल?

चांदीच्या वर्खाबाबत अनेक खुलासे होत असतात. मिठाईवर दिसणारा चांदीचा वर्ख अनेकदा भेसळयुक्त असल्याचे समोर आले आहे. तुम्हीही चांदीचा वर्ख असलेली मिठाई घेत असाल तर तो वर्ख हाताने चोळून पाहा. शुद्ध चांदी असेल तर ते घासल्यावर मिठाईपासून वेगळे होईल. जर वर्ख चांदीचा बनलेला नसेल तर तो मिठाईला चिकटून राहतो. मिठाईमध्ये पेस्ट केलेले काम अॅल्युमिनियमचे असू शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नीट तपासा आणि शक्य असल्यास घरीच मिठाई तयार करा.

First published:
top videos

    Tags: Diwali, Food