नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये हेल्दी डाएटची क्रेझ वाढली आहे. निरोगी आयुष्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक आहाराबद्दल फार सजग झाले आहेत. ते हेल्दी राहण्यासाठी अधिकाधिक हेल्थ टिप्स फॉलो करत आहेत आणि आहाराची विशेष काळजी घेत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते पोषक आहार घेण्यापर्यंत लोकांचा प्राधान्यक्रम बदलतोय. हे पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने काही आरोग्य टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला डायबेटिस आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासूनही दूर राहता येईल. डब्ल्युएचओच्या मते, जर आपण आपल्या आहारात साखर आणि मीठ योग्य प्रमाणात घेतलं आणि त्याचा अतिरेक टाळला तर त्यामुळे आपल्याला अनेक मोठ्या आजारांपासून वाचण्यास मदत होऊ शकते. BP Low झाल्यास लगेच करा हे काम, औषधांची पण गरज नाही लागणार किती मीठ खावं? जर तुम्ही मिठाचं जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर तुम्ही तुमची सवय बदलण्याची गरज आहे. कारण ते 5 ग्रॅम म्हणजे एका चमच्यापेक्षा जास्त असूच नये. त्याऐवजी, मसाले आणि हर्ब्स खा. याशिवाय मीठ असलेला सॉस खाऊ नका. या बरोबरच सोया सॉस किंवा फिश सॉसही आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. किती साखर खायची? WHO च्या म्हणण्यानुसार, तुम्ही दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त म्हणजेच 12 टीस्पूनपेक्षा जास्त साखर खाऊ नये, नाहीतर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. जर तुम्ही दररोज 25 ग्रॅम म्हणजे 6 चमचे साखरेचं सेवन केलं तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. Heart Attack नाही, तर ‘या’ 4 कारणांमुळे देखील दुखू शकते छातीत यांनी टाळावं साखर आणि मीठ जर तुमच्या मुलाचं वय 2 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याच्या आहारात साखर किंवा मीठ असलेल्या गोष्टींचा कधीही समावेश करू नका. तर यापेक्षा मोठ्या मुलांनाही साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात खायला द्यावं. जर तुम्ही या हेल्दी टिप्सचं पालन केलं तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील. एवढंच नाही तर असं केल्याने तुम्ही कॅन्सर आणि डायबेटिससारख्या आजारांपासूनही दूर राहाल. सध्याची बदलती लाइफस्टाईल आणि बदलता आहार अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे जंक फूड खाणं टाळावं, यासोबतच साखर आणि मिठाचं अतिरिक्त प्रमाण असलेले पदार्थदेखील खाऊ नये. हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्यापेक्षा नुकसान अधिक होतं. या पदार्थांपासून जितकं लांब राहाल तितकेच त्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.