मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय...खरंच? बिनधास्त खा फ्रेंच फ्राईज! ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; संशोधकांचा दावा

काय...खरंच? बिनधास्त खा फ्रेंच फ्राईज! ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; संशोधकांचा दावा

बरोबर वाचलंत हेडिंग. Junk Food म्हणून वाईट असा शिक्का बसलेल्या फ्रेंच फ्राइजबद्दल नवं संशोधन सांगतं - या पदार्थाने BP नियंत्रणात राहील. अर्थात हॉटेलमधल्या तळलेल्या फ्राइज इथे अपेक्षित नाहीत.

बरोबर वाचलंत हेडिंग. Junk Food म्हणून वाईट असा शिक्का बसलेल्या फ्रेंच फ्राइजबद्दल नवं संशोधन सांगतं - या पदार्थाने BP नियंत्रणात राहील. अर्थात हॉटेलमधल्या तळलेल्या फ्राइज इथे अपेक्षित नाहीत.

बरोबर वाचलंत हेडिंग. Junk Food म्हणून वाईट असा शिक्का बसलेल्या फ्रेंच फ्राइजबद्दल नवं संशोधन सांगतं - या पदार्थाने BP नियंत्रणात राहील. अर्थात हॉटेलमधल्या तळलेल्या फ्राइज इथे अपेक्षित नाहीत.

नवी दिल्ली, 3 जुलै: तुम्हाला फ्रेंच फ्राईज खायला आवडतात का? असा प्रश्न आपण कुणालाही विचारला तर नाही म्हणणारे अगदी अपवाद आढळतील. घरी बटाटा खाऊन वैतागलेली व्यक्ती बाहेर जाऊन फ्रेंच फ्राईज (French Fries) आवडीने खाते. इतकं ते लोकांना आवडतं. फ्रेंच फ्राईज जंक फूड (junk food) मानलं जातं. त्यामुळे वजन वाढतं, तेलकट (oily) असल्याने शरीरास चांगलं नसतं म्हणून ते खाणं टाळावं, असा सल्ला हेल्थ एक्स्पर्ट देतात. पण नुकत्याच एका संशोधनानंतर संशोधकांनी फ्रेंच फ्राईज शरीरासाठी चांगले असून ते खाण्याचा सल्ला दिलाय. फ्रेंच फ्राईजमध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी नॅचरल पोटॅशिअम (Natural Potassium) असल्याचं संशोधकांनी म्हटलंय.

ही बातमी वाचून ब्लड प्रेशरचा त्रास असलेले लोक खूश झाले असतील. पण त्याआधी महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला फ्राईड नाही तर बेक्ड म्हणजे भाजलेले फ्रेंच फ्राईज खायचे आहेत. याबाबत झी हिंदीने सविस्तर वृत्त दिलंय.

अमेरिकेमधील पर्ड्यू यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी फ्रेंच फ्राईजवर हे संशोधन केलंय.

नको कलर, नको मेहंदी; फक्त एक गोष्ट करा; केस काळे झालेच समजा

या संशोधनानुसार, बटाट्यामध्ये नॅचरल पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे बटाट्याचे सेवन करून तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकता. बेक्ड बटाटा खाल्ल्याने सिस्टोलिक ब्लड प्रेशर (Systolic Blood Pressure) कमी होतं असं संशोधकांनी म्हटलंय. हे संशोधन रिसर्च जर्नल न्यूट्रियंट्समध्ये प्रकाशित झालंय.

या संशोधनात सहभागी असलेले मुख्य रिसर्चर कोनी व्हिवर यांनी म्हटलं की, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियमचे (Sodium) प्रमाण कमी असलेले जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सोडिअमयुक्त अन्न खाणं टाळलं तरी शरीरात जे सोडिअम तयार होतं त्याचं काय? हा प्रश्न अनुत्तरीत होता. याबाबतच रिसर्च करण्यात आला. त्यात म्हटलंय की पोटॅशिअम शरीरात तयार झालेले सोडिअम कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे नॅचरल पोटॅशिअम असलेले पदार्थ डाएटमध्ये समाविष्ट केल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी बेक्ड बटाटा खूप उपयुक्त आहे.

अखेर करा तुमचा Dream Job! भारतातील ही कंपनी देतेय 9 तास झोपण्याचे 10 लाख

हे संशोधन 30 जणांवर करण्यात आलं. या 30 जणांना 4 टीम्समध्ये ठेवलं. त्यापैकी काही जणांना बटाट्यापासून तयार केलेले पदार्थ खायला दिलेत. तर काही जणांना पोटॅशिअम सप्लीमेंट्स दिले. यानंतर त्यांच्यावर ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवण्यात आलं. याचा निकाल म्हणजे ज्या लोकांनी बेक्ड बटाटा खाल्ला होता त्यांच्या शरीरातील पोटशिअमचे प्रमाण हे सप्लीमेंट्स दिलेल्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त होते.

तुमच्या आजूबाजूला कोणी फ्रेंच फ्राईजचं चाहतं असेल पण ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने खाणं टाळत असेल तर त्याला तुम्ही फ्रेंच फ्राईज खाण्याचा सल्ला देऊ शकता. मात्र ते बेक्ड असतील याची काळजी घ्या.

First published:

Tags: Food, Junk