मुंबई, 20 जुलै : प्लेटलेट्स या शरीरातील रक्त पेशी असतात, त्या रक्त योग्यरित्या राहण्यास मदत करतात. शरीरात प्लेटलेट्सची योग्य संख्या असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक कारणांमुळे आपल्या प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. जसे की विविध प्रकारचे संसर्ग, कर्करोगावरील उपचार, जास्त मद्यपान आणि ताप. अनेकदा डेंग्यूच्या तापात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. डॉक्टरांच्या मते, आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या सुमारे दीड ते साडेचार लाख असावी. रक्त चाचणीद्वारे, आपण रक्तपेशींची सहज तपासणी करू (How to increase Platelet Count) शकतो. हे पदार्थ प्लेटलेट्ससाठी आवश्यक असतात कमी प्लेटलेट्सची सुरुवातीची लक्षणे म्हणजे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा. प्लेटलेटची संख्या कमी झाली तरी घाबरू नका. आहारात काही पौष्टिक गोष्टींचा समावेश करून आपण ती सहज वाढवू शकतो. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले अन्न खूप महत्त्वाचे आहे. डेंग्यू आणि इतर आजारांमध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन केले जाऊ शकते ते जाणून घेऊया. व्हिटॅमिन बी 12 - हेल्थलाइनच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी 12 चे सेवन केल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढते. अंडी, मांस, प्राण्यांचे यकृत हे व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्रोत मानले जातात. गाईचे दूध आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. व्हीट ग्रास गव्हाच्या अंकुरांमध्ये (व्हीट ग्रास) क्लोरोफिल मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीरात लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करते. व्हीटग्रासची कोरडी पावडर रस किंवा पाण्यात मिसळून व्हीटग्रास खाऊ शकतो. फोलेट- फोलेटचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. शरीरातील फोलेटचे प्रमाण वाढवण्यासाठी शेंगदाणे, काळे वाटाणे, राजमा, संत्री, लिंबू, द्राक्षे यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा व्हिटॅमिन सी - व्हिटॅमिन सी केवळ प्लेटलेट्स वाढवत नाही तर त्यांना योग्यरित्या कार्य करण्यास देखील मदत करते. आंबा, अननस, ब्रोकोली, हिरवी आणि लाल मिरी, टोमॅटो आणि कोबी हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी त्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.