जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Best Vadapav : पुण्यात मिळतं 2 वडे आणि जम्बो पावचं कॉम्बिनेशन, 50 वर्षांपासून फेमस, Video

Best Vadapav : पुण्यात मिळतं 2 वडे आणि जम्बो पावचं कॉम्बिनेशन, 50 वर्षांपासून फेमस, Video

Best Vadapav : पुण्यात मिळतं 2 वडे आणि जम्बो पावचं कॉम्बिनेशन, 50 वर्षांपासून फेमस, Video

Best VadaPav In Pune : पुण्यातील शिक्षक दाम्पत्यानं सुरू केलेल्या या वडापावची लोकप्रियता 50 वर्षांपासून कायम आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 10 एप्रिल :  महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थांमध्ये आता वडापावनंही महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. मुंबईकरांचे आवडते असे हे फास्ट फुड आता राज्यातील सर्वच शहरात मिळते. प्रत्येक शहरात किमान एक खास वडापावचा स्टॉल नक्की असतो. या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी नेहमी गर्दी होत असते. पुण्यात तर वडापावचे अनेक स्टॉल फेमस आहेत. या वडापावच्या गर्दीमध्ये सहकार नगरच्या श्रीकृष्ण वडेवाले यांचा वडापावनं वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वडापावनं गेल्या 50 वर्षांपासून आपली परंपरा जपली आहे. काय आहे खासियत? श्रीकृष्ण वडेवाले यांच्याकडे तुम्हाला दोन वडे आणि एक जम्बो पाव घ्यावा लागतो. या स्टॉलचे मालकीण शशिकला भगत यांनी याबाबत अधिक माहिती सांगितली. त्या यावेळी बोलताना म्हणाल्या की, ‘गेल्या 50 वर्षांपासून आम्ही वडापावची विक्री करत आहोत. त्यापूर्वी आमची इथं बेकरी होती. आम्हाला ही कल्पना आमच्या आचाऱ्यानं सुचवली. आमचे वडे लोकांना इतके आवडले की आम्ही आमचा बेकरीचा मुख्य व्यवसाय सोडून वडापाव विक्री हा मुख्य उद्योग सुरू केला. मी आणि माझे पती महापालिकेत्या शाळेत शिक्षक होतो. आम्ही आमचा शिक्षकी पेशा सांभाळून हा व्यवसाय सुरू केला. एक किलोपासून आमचा प्पवास सुरू झाला. आता 70 ते 80 किलो बटाट्यापासूनच्या वड्यांची आमची विक्री होते. आमच्या जम्बो वडापावची किंमत 32 रूपये आहे. त्याचबरोबर छोटे पाव वापरूनही आम्ही 16 रुपयांना वडापावची विक्री करतो,’ अशी माहिती त्यांनी दिली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आपण वडापाव खाताना एक वडा आणि एक मिडीयम साईजचा पाव आपल्याला मिळतो. मात्र आमच्या इथे एक जम्बो साईजचा पाव आम्ही खास बेकरी मधून बनवून घेतो. त्या जम्बो साईजच्या पावासोबत तुम्हाला दोन वडे लागतात. त्यासोबतच आम्ही वड्यसाठी पीठ आणि मसाले हे घरीच बनवतो. हा वडापाव खाण्यासाठी संपूर्ण पुणे शहरातून खवय्ये येता. सध्या परदेशात असलेले आमचे ग्राहक देखील पुण्यात परतल्यानंतर इथं आवर्जून येतात, असं शशिकला यांनी सांगितलं. पुण्यातील ‘या’ स्टॉलवर वडापावसाठी लागते चक्क रांग! पाहा काय आहे खास, Video ‘आम्ही गेल्या 40 वर्षांपासून इथं वडापाव खात आहोत. याची चव अजूनही बदललेली नाही. हा वडापाव गरम-गरम खाण्यातच मजा आहे. जिभेला चटका लागत गर-गरम वडापाव खाणे, हा स्वर्गसुखाचा अनुभव आहे’, अशी प्रतिक्रिया येथील नियमित ग्राहक गजानन कराळे यांनी दिली.

    गूगल मॅपवरून साभार

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात