जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मुंगीच्या अंड्यांपासून केली जाते भाजी, तुम्हीही घरी करू शकता ट्राय, अशी आहे रेसिपी!

मुंगीच्या अंड्यांपासून केली जाते भाजी, तुम्हीही घरी करू शकता ट्राय, अशी आहे रेसिपी!

या अंड्यांपासून बनवलेल्या रेसिपी अत्यंत स्वादिष्ट लागतात, परंतु त्यांची चव जरा आंबट असते.

या अंड्यांपासून बनवलेल्या रेसिपी अत्यंत स्वादिष्ट लागतात, परंतु त्यांची चव जरा आंबट असते.

लाल मुंग्यांच्या अंड्यांमध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यांना B12 जीवनसत्त्वाचं स्रोत मानलं जातं. शिवाय त्यात लोह आणि कॅल्शिअमदेखील असतं.

  • -MIN READ Local18 Assam
  • Last Updated :

तुलिका देवी, प्रतिनिधी दिसपूर, 9 जून : घरात मुंग्या दिसणं ही एक सामान्य बाब आहे. पावसाच्या सुरुवातीला किंवा उन्हाळयात मुंग्यांची रांग आपल्याला साधारणत: नेहमीच दिसते. काळ्या मुंग्या चावत नाहीत म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो पण लाल मुंग्या मात्र जोरदार चावतात म्हणून आपण त्यांच्यावर लगेच औषध करतो. परंतु तुम्हाला माहितीये का, आसाम राज्यातील लोक या लाल मुंग्यांच्या डंखाला अजिबात घाबरत नाहीत, उलट त्यांच्या अंड्यांपासून चक्क वेगवेगळ्या रेसिपी बनवून खातात तेही अगदी चवीने. आसामी लोक लाल मुंग्यांच्या अंड्यांना ‘अमरोली पोरुआर तूप’ असं म्हणतात. विशेषतः एप्रिल महिन्यात कापणीच्या वेळी ‘बोहाग बिहू पर्व’ म्हणजेच आसामी नववर्षाचं स्वागत करताना या अंड्यांच्या रेसिपी बनवल्या जातात आणि घरात बनवलेल्या दारूसोबत लोक आवडीने खातात. आपल्या शरीरावर कुठेही चुरचुरायला लागलं आणि आजूबाजूला लाल मुंगी दिसली की, आपण समजून जातो ही मुंगी आपल्याला चावली. परंतु ही क्रिया एवढी साधी सोपी नसते, तर लाल मुंग्या या अतिशय आक्रमक आणि सतर्क असतात. शत्रूवर हल्लाबोल करायला त्या सदैव तयार राहतात. म्हणूनच एक खतरनाक द्रवपदार्थ आपल्या पाठीवर घेऊनच फिरतात. त्या आपल्याला चावतात म्हणजे केवळ तोंडाने आपल्या मासाचा चावा घेतात असं नाही, तर पाठीवरील द्रव पदार्थ आपल्या शरीरात सोडतात. म्हणूनच एवढीशी लाल मुंगी चावल्यावर आपल्याला एवढी जास्त वेदना होते.

News18लोकमत
News18लोकमत

साधारणतः पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला या मुंग्या आंबा आणि फणसाच्या झाडावर पानांचं एक सुंदर घरटं तयार करून त्यात अंडी देतात. त्यांची अंडी कोंबडीच्या अंड्यांसारखीच पांढरीफटक असतात. परंतु दिसायला तांदळासारखी दिसतात. आसाममधील लोक या मुंग्यांसकट त्यांची अंडी बाहेर काढून जेवण बनवण्यासाठी घरी घेऊन जातात. या अंड्यांपासून बनवलेल्या रेसिपी अत्यंत स्वादिष्ट लागतात, असं तेथील लोक सांगतात. परंतु त्यांची चव जरा आंबट असते. हा आंबटपणा घालवण्यासाठी अंड्यांना चिकटलेल्या मुंग्या काढून टाकल्या जातात. तेव्हा ही अंडी जरा कमी आंबट लागतात. आज आपण त्यांची एक रेसिपी पाहूया. Weather Update : पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? या जिल्ह्यांत पावसाचा इशारा जसं आपल्याकडे चुलीवर जेवण बनवलं जातं त्याचप्रमाणे आसामी लोक लाकडाच्या आगीवर जेवण बनवणं पसंत करतात. ही अंडीदेखील अशाप्रकारेच बनवली जातात. फक्त त्यात मसाला आणि तेल कमी प्रमाणात घातलं जातं. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया…सर्वात आधी एका भांड्यात तेल तापवून कापलेला कांदा घालावा. कांद्याचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत परतावं. आता यात मुंग्यांची अंडी घालून हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल मसाल्यात छान परतून घ्यावं. वरून हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवावं. 5 मिनिटांपर्यंत एक वाफ येऊ द्यावी. आता टोमॅटो आणि गरम मसाला घालून 2 मिनिटांपर्यंत परतून घ्यावं. मिश्रण व्यवस्थित फ्राय झाल्यावर भांडं चुलीवरून खाली उतरवावं. आपण ही रेसिपी भातासोबत सर्व्ह करू शकता. दरम्यान, तेथील लोक असं म्हणतात की, लाल मुंग्यांच्या अंड्यांमध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यांना B12 जीवनसत्त्वाचं स्रोत मानलं जातं. शिवाय त्यात लोह आणि कॅल्शिअमदेखील असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात