जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'डी' जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत; 'या' भाजीमुळे हाडांचं दुखणं पळून जाईल

'डी' जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत; 'या' भाजीमुळे हाडांचं दुखणं पळून जाईल

कमकुवत हाडं असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात त्याचा समावेश करणं फायद्याचं ठरतं.

कमकुवत हाडं असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात त्याचा समावेश करणं फायद्याचं ठरतं.

एक स्वादिष्ट भाज्यांपैकी एक म्हणून लोकांची त्याला पसंती मिळते. केवळ पावसाळ्यातच ते बाजारात येत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

  • -MIN READ Local18 Bikaner,Rajasthan
  • Last Updated :

निखिल स्वामी, प्रतिनिधी  बिकानेर, 8 जून : जगभरात अनेक पाककृतींमध्ये मशरूमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बटण मशरूम हा कदाचित जगभरात खाल्ला जाणारा सर्वात सामान्य मशरूम प्रकार आहे. मशरूम हा अष्टपैलू पदार्थ म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतातही त्याला मोठी मागणी आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली असून बाजारात मशरूम दिसू लागले आहेत. बिकानेर जिह्ल्यात मशरूमला ‘खुंबी’ असं म्हटलं जातं. तेथील स्वादिष्ट भाज्यांपैकी एक म्हणून लोकांची त्याला पसंती मिळते. केवळ पावसाळ्यातच ते बाजारात येत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शिवाय मशरूममध्ये डी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असल्याने कमकुवत हाडं असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात त्याचा समावेश करणं फायद्याचं ठरतं.

News18लोकमत
News18लोकमत

मशरूम व्यापारी सोनमूल खत्री यांनी याबाबत सांगितलं, बिकानेरमध्ये जवळच्या एका गावाहून मशरूम आणून 500 ते 600 रुपये किलो दराने विकले जातात. आता पावसाची सुरुवात असल्यामुळे हा दर आहे, मात्र एकदा का पावसाळा पूर्णपणे सुरू झाला की मग हा दर 1000 ते 2000 रुपयांवर पोहोचेल. दरवर्षी मशरूममधून चांगलं उत्त्पन्न मिळतं. Horoscope : बुध ग्रहाचा ‘या’ राशीत प्रवेश! ‘या’ राशींची होणार चांदी, तुमची रास आहे का यात? दरम्यान, मशरूम ही वनस्पती नसून एक खाद्य बुरशी आहे. ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. सहसा भाजी म्हणून खाल्लं जाणारं मशरूम जीवनसत्त्वांचा एक उत्तम स्रोत मानलं जातं. त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असतं. शिवाय मधुमेह असलेल्या लोकांसाठी मशरूम खूप आरोग्यदायी आहे. तसेच डायट करणाऱ्यांसाठीही मशरूम उपयुक्त ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात