पियुष पाठक, प्रतिनिधी अलवर, 11 जून : आपण दरवर्षी आपल्या वाढदिवशी केक कापतो. जवळपास सर्वांनाच केक कापून वाढदिवस साजरा करायला आवडतं. परंतु आजकाल केवळ वाढदिवसच नाही, तर इतर कोणतंही लहान-मोठं सेलिब्रेशन केक कापूनच केलं जातं. त्यामुळे आता बाजारात केकच्या नवनवीन डिझाइन्सदेखील आल्या आहेत. परंतु केक खरेदी करण्यापूर्वी ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही हेदेखील जाणून घेणं आवश्यक आहे. राजस्थानातील अलवर शहरात असलेल्या ‘टेस्ट फॉर यू’ बेकारीचे मालक धर्मेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘केक बनवण्याच्या दोन प्रक्रिया असतात. आजकाल बहुतेक बेकरीमध्ये एग्लेस केक बनवले जातात. कारण हा केक बराच काळ टिकू शकतो. पटकन खराब होत नाही. हे मिल्कमेड आणि जेलपासून बनवले जाते. पूर्वीच्या काळी व्हॅनिला आणि चॉकलेट केक जास्त लोकप्रिय असायचे. परंतु आता ट्रेंडिंग केक लोकांना जास्त आवडू लागले आहेत. तर दुसरीकडे, अंड्याचा केक लवकर खराब होतो. अशावेळी केक विकत घेताना त्यात वास येणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर केक शिळा असेल तर त्यावर पाण्याचे थेंब गोठतात.’
जुना केक खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. याबाबत डॉ. नीरव शर्मा यांनी सांगितलं की, त्यामुळे केक नेहमी ताजा खावा. शिळ्या केकमध्ये अनेक हानिकारक जीवाणू तयार होतात. जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. तसेच लहान मुलांना अन्नातून विषबाधा होण्याची समस्या लवकर होते. Raj Thackeray : ‘…मग माझ्याकडे येता कशाला?’, राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल दरम्यान, आजकाल प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी केकला मागणी असते. त्यामुळेच बेकरीमध्ये विविध प्रकारचे केक तयार केले जातात. ज्यात फोटो केक, लाइटिंग केक, वेल्वेट केक, फ्रूट केक, हेझलनट केक, इत्यादी केक ट्रेंडिंग आहेत. सकाळी बेकरीमध्ये केक ऑर्डर करून संध्याकाळी डिलिव्हरी घेता येते. यासोबतच ग्राहकांकडून मागणी असल्यास त्यांच्या मागणीनुसार बेकरीमध्ये केक बनवले जातात.