रवी पटनायक, प्रतिनिधी भिलवाडा, 19 मे: सध्याच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्वांच्याच तोंडाला फास्ट फूडची चव आहे. सध्या तरूण आणि लहान मुले फास्ट फूड खाण्यास अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे केवळ शहरातच नाही तर गाव-खेड्यातही फास्ट फूडची दुकाने जोरात सुरू होत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की हे फास्ट फूड तुमच्या शरीराला किती हानी पोहोचवत आहे. फास्ट फूड खाल्ल्यानं केवळ पचनक्रियेवरच परिणाम होत नाही इतर आजारांनाही आमंत्रण दिलं जातंय.
फास्ट फूडची वाढती क्रेझ गेल्या काही वर्षांपर्यंत खेडे आणि शहरांमध्ये फास्ट फूडची दुकाने दिसत नव्हती. केवळ मोठ्या शहरातच फास्ट फूडची दुकाने होती. पण आता बहुतांश खेड्यातही फास्ट फूडची दुकाने दिसतात. गेल्या 10 वर्षात ही दुकाने झपाट्याने विस्तारत आहेत.अशा परिस्थितीत तरुण पिढीची पसंती मोमोज, चाउमीन, बर्गर, पिझ्झा, पास्ता, मॅकरोनी आणि मंचूरियन या पदार्थांकडे आहे. आजकाल छोटीशी भेट असो वा मित्रमंडळींची मेजवानी, हे सगळे फास्ट फूडच्या दुकानात आयोजित केले जाऊ लागले आहे. जे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. Wardha News: ‘हे’ रस पिण्यासाठी वर्ध्यात पहाटेच लागतात रांगा, पाहा काय आहे कारण? Video किती घातक आहे फास्ट फूड? राजस्थानातील भिलवाडा येथील उपमुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ घनश्याम चावला यांच्या मते फास्ट फूड आरोग्यासाठी हानिकारक आहे. फास्ट फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यास मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका असतो. चरबी सह फास्ट फूडचा मज्जासंस्थेवरही विपरीत परिणाम होतो. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन स्मरणशक्तीही कमकुवत होते. फास्ट फूडचे सेवन केल्याने डोकेदुखी आणि नैराश्याची समस्या वाढू शकते. जास्त सेवन केल्याने पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि शारीरिक विकासात अडथळा येतो. फास्ट फूडमध्ये पोषक तत्वांचा अभाव असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.