मुंबई, 01 एप्रिल : चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो. आपल्याकडे पारंपरिक आहारात भात, चपाती अर्थात पोळी, भाजी, डाळ आदी पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ पारंपरिक पद्धतीनं बनवले जातात. अलीकडच्या काळात जेवण बनवण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पण या गोष्टींचा नकळत परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. देशातील प्रत्येक भागात चपाती वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. नुकतंच चपाती बनवण्याच्या पद्धतीवर एक संशोधन करण्यात आलं. यातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
चपाती चुकीच्या पद्धतीनं बनवल्यास कॅन्सर अर्थात कर्करोग होण्याची शक्यता वाढते, असं या संशोधनात दिसून आलं आहे. हे संशोधन नेमकं काय सांगतं, ते जाणून घेऊया. उत्तर भारतात चपाती बनवण्यासाठी एक सामान्य पद्धत अवलंबली जाते. मात्र प्रत्येक घरामध्ये चपाती बनवण्याच्या पद्धतीत थोडा फरक आहे. काही लोक तव्यावर थोडी चपाती भाजतात त्यानंतर चिमट्याच्या मदतीने गॅसवर राहिलेली चपाती भाजतात. मात्र काही लोक केवळ तव्यावरच चपाती पूर्णपणे भाजून घेतात. या दोन्ही प्रकारे चपाती भाजल्यास तिच्या चवीत फरक पडतो असं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे.
पण आता चपाती बनवण्याच्या पद्धतीविषयी नुकत्याच केलेल्या संशोधनातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत, असं वृत्त झी न्यूज हिंदीने दिलं आहे.
अंडं आधी की कोंबडी सोडा, आता चिकन पक्षी की प्राणी यावरून वाद; प्रकरण कोर्टात
न्युट्रिशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही उच्च तापमानावर चपाती बनवली तर त्यात कार्सिनोजेनिक घटक तयार होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो, तर सामान्य लोकांना श्वसन विकार होण्याचा धोका वाढतो.
एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, कुकटॉप आणि एलपीजी गॅसमधून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साईड सारखे अनेक धोकादायक वायू उत्सर्जित होतात. जागतिक आरोग्य संघटनेने हे वायू आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. यामुळे श्वसन विकार, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित विकार होतात. यामुळे माणसाचा जीवही जाऊ शकतो.
100 रुपयांच्या जुन्या पर्सने केलं मालामाल; एका रात्रीत लखपती बनली तरुणी; कसं ते पाहा
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांच्यामते, "गॅसवर चपाती करताना त्यातून अॅक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. तसेच थेट गॅसच्या ज्वाळांवर चपाती भाजल्यास त्यात कार्सिनोजेन्स तयार होतात. हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात"
या संशोधनातून निष्पन्न झालेले निष्कर्ष खरे आहेत, हे ठोसपणे सांगता येत नाही. पण संशोधनातील बाबी माणसांमध्ये चिंता निर्माण करणाऱ्या आहेत, हे नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.