पवन सिंह कुंवर/18 मार्च, डेहराडून : महागाई वाढते आहे. कित्येक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. साधा वडापाव खायला गेलात तरी 20 रुपये लागतात. अशात फक्त एका 5 रुपयाच्या थालीने लाखो लोकांची भूक भागवली आहे. 5 रुपयांच्या थालीत एक-दोन नव्हे तर तब्बल 16 लाख लोक जेवले आहेत. उत्तराखंडमधील ही थाली चर्चेत आली आहे.
हल्द्वानीच्या कुमाऊंतील सुशीला तिवारी हॉस्पिटलजवळ थाल सेवा आहे. जिथं गरजू, भुकेल्या लोकांचं पोट भरतं. 18 ऑक्टोर, 2018 साली ही सेवा सुरू झाली. जिथं दररोज हजारपेक्षा जास्त लोक जेवायला येतात. इथं फक्त पाच रुपयांत जेवणाची थाळी मिळते. या पाच रुपयांच्या थाळीमुळे 16 लाख लोकांचं पोट भरलं आहे. 5 रुपयांच्या थालीत भात, राजमा, चणा, मिक्स डाळ अशा डाळी असतात.
पोलिसाच्या घरातील लग्नाचा गाजर हलवा, रसगुल्ला पडला भारी; पोलिसात पोहोचलं प्रकरण, नेमकं काय घडलं?
थाल सेवेचे संस्थापक दिनेश मनसेरा यांनी सांगितलं, सुशीला तिवारी रुग्णालयात येणाऱ्या लोकांना स्वस्तात जेवण उलब्ध करून देण्यासाठी आम्ही ही सेवा सुरू केली. 2018 सालापासून आतापर्यंत कोणत्याही सल्ल्याशिवाय हे काम सुरू आहे. आमची 13 लोकांची टीम आहे. आम्ही दिवसाला जवळपास 1200 ते 1300 लोकांना जेवण देतो. महागाई वाढली तरी आम्ही 5 रुपयांत जेवण देतो. आतापर्यंत आम्ही 16 लाख थाली पुरवल्या आहेत. दुपारी 12 ते 2 बजे पर्यंत जितके लोक येतात तितक्यांना आम्ही जेवण देतो.
स्थानिक तरुण सूजर बिष्टने सांगितलं, मी जेव्हा कधी इथून जातो तेव्हा इथं जेवायला जरूर येतो. इथलं जेवण एकदम शुद्ध असतं. आजूबाजूच्या शहरासह रुग्णालयात येणारे लोक, कित्येक वेळा डॉक्टर, नर्सही इथं जेवण करायला येतात.
लेकाला चावला उंदीर, बाबाची पोलिसात धाव; नेमकं प्रकरण काय? VIDEO पाहा
या थालसेवाला दरदिवशी एका कुटुंबाकडून 5000 रुपयांची आर्थिक मदतही मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Lifestyle, Local18, Uttarakhand, Viral