जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पोलिसाच्या घरातील लग्नाचा गाजर हलवा, रसगुल्ला पडला भारी; पोलिसात पोहोचलं प्रकरण, नेमकं काय घडलं?

पोलिसाच्या घरातील लग्नाचा गाजर हलवा, रसगुल्ला पडला भारी; पोलिसात पोहोचलं प्रकरण, नेमकं काय घडलं?

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

पोलिसाच्या घरातील लग्नात गाजर हलवा, रसगुल्ला खाल्ल्यानंतर असं काही घडलं की प्रकरण थेट पोलिसा ठाण्यात पोहोचलं.

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

वसीम अहमद/ 15 मार्च, लखनऊ : लग्न म्हटलं की बहुतेकांचं लक्ष असतं ते जेवणाकडे. विशेषतः स्वीट काय आहे त्याकडे. अशाच एका पोलिसाच्या घरातील लग्नातील स्वीट चांगलंच महागात पडलं आहे. या लग्नात गाजर हलवा आणि रसगुल्ला खाणं भारी पडलं. पोलिसाच्या घरातील लग्नाचं हे प्रकरण थेट पोलिसात पोहोचलं आहे.  उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील हे प्रकरण. नेमकं असं काय घडलं ते पाहुयात. गांधी पार्कच्या डोरी नगरमध्ये राहणारे पोलीस गेंदाल लाल सिंह फिरोजाबाद पोलीसमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांची मुलगी संध्याचं लग्न नगला रंजिताचा राहणारा हरवेंद्रसोबत होत होतं. 12, मार्च रविवारी शांती राज फार्म हाऊसमध्ये हा लग्नसोहळा होता. लग्नात खाण्याचे बरेच पदार्थ होते. मिठाईमध्ये गाजर हलवा आणि रसगुल्ला होता. पण ही मिठाई लोकांना चांगलीच भारी पडली. उन्हाळ्यात कलिंगड खाताय सावधान! आधी हा VIDEO जरूर पाहा स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नातील गाजर हलवा आणि रसगुल्ला शिल्लक राहिले होते. त्यामुळे गेंदा लाल यांच्या कुटुंबाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शेजारी राहणाऱ्या लोकांना ते दिलं. ते खाल्ल्यानंतर सोमवारी रात्री एकेएकेाची तब्येत बिघडू लागली. काहींना प्रायव्हेट तर काहींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल 30 पेक्षा अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. आजारी लोकांनी सांगितलं की, त्यांनी गाजर हलवा आणि रसगुल्ला खाल्ला होता. त्यानंतर त्यांंना उलट्या होऊ लागल्या, पोटात जंत झाले.

News18लोकमत
News18लोकमत

पोलीस गेंदा लाल सिंह म्हणाले, त्यांच्या कुटुंबातील सदस्य स्थानिक लोकांसह वऱ्हाड्यांचीही तब्येत बिघडली आहे. सुमारे 3 डझन असे लोक आहेत. यात लहान मुलं-मुली, तरुण-तरुणी आणि प्रौढ, वयस्कर लोकांचाही समावेश आहे. केटर्स रोबिन सिंह आणि बालाजी स्वीट सेंटर इथून खवा, पनीर आणि दूध आलं होतं. त्यांच्याविरोधात गांधी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केटर्सवर एफआयर दाखल करण्यात आला आहे. वाट्टेल तेव्हा खाऊन चालत नाही; कलिंगड खाण्याची ‘ही’ योग्य वेळ, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होईल अलिगढ आरोग्य विभागाला याची माहिती होताच विभागाचं पथक तिथं दाखल झालं. अलिगढचे सीएमओ नीरज त्यागी यांनी सांगितलं की, हे प्रकरण फूड पॉइझनिगचं आहे. आरोग्य विभागाने घटनास्थळी जात परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. काही जणांवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात